शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

"मराठी लोकांना त्रास दिला तर..."; पुण्यात कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासले, सीमावादाचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 3:47 PM

स्वारगेट डेपोजवळ उभ्या असलेल्या कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासून त्यावर जय महाराष्ट्र लिहून निषेध....

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर हा वाद पुन्हा वर आला होता. कर्नाटकात मराठी वाहनांची तोडफोड झाल्यानंतर आता पुण्यात कानडी वाहनांना त्याचा फटका बसला आहे. पुण्यातील शिवसैनिकांनी कर्नाटक राज्याच्या परिवहन बसेसवर काळं फासत निषेध नोंदविला आहे. स्वारगेट डेपोजवळ उभ्या असलेल्या कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासून त्यावर जय महाराष्ट्र लिहून निषेध नोंदविला. जर मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राच्या गाड्यांना कर्नाटकात त्रास दिला तर आम्ही एकही कर्नाटकची गाडी येऊ देणार नाही असं आंदोलकांनी सांगितले. बेळगाव सीमेवर महाराष्ट्राच्या गाड्या कर्नाटकमधील नागरिकांनी फोडल्या असून आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असंही यावेळी आंदोलकांनी सांगितले.

 

अनेक आंदोलकांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं आहे. स्वारगेट परिसरात कर्नाटकच्या गाड्या लावल्या जातात. तिथं जाऊन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध नोंदविला. महाराष्ट्र गाड्यांवर जर कर्नाटकात हल्ला झाला तर आम्ही शांत बसणार नाही, असंही यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी प्रतिक्रिया दिली.

काय आहे सीमाप्रश्न?कर्नाटक-महाराष्ट्र दरम्यानचा सीमाप्रश्न गेल्या सहा दशकांपासून प्रलंबित आहे. सीमा भागातील सुमारे सात हजार किलोमीटर भूभागावर महाराष्ट्राने आपल्या दावा सांगितला आहे. यामध्ये गुलबर्गा, उत्तर कन्नड, बिदर, निपाणी, बेळगाव व कारवार या शहरांसह 814 मराठी भाषिक गावांचा समावेश आहे. या संदर्भाची याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 1966 मध्ये केंद्र सरकारने सीमाप्रश्न सोडवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मेहरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. या आयोगाच्या अहवालात, बेळगाव कर्नाटकमध्ये राहील, उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवारसह 264 गावे व सुपा प्रांतातील 300 गावे महाराष्ट्राला द्यावी, सोलापूरसह 247 गावे कर्नाटकात समाविष्ठ करावीत असं सागितलं. पण याला दोन्ही राज्यांनी नकार दिला. महाजन आयोगासमोर दक्षिण सोलापुरचे तत्कालिन आमदार शिवदारे यांनीही साक्ष दिली होती. त्यात त्यांनी सोलापूर जिल्हा परिसरात कन्नड भाषिक असले तरी त्यांचा ऐतिहासिक आणि भौगोलिक अनुबंध महाराष्ट्राशी कसा आहे, हे पटवून दिले होते. विशेष म्हणजे हा प्रश्न आंदोलन व हिंसेने सुटणार नाही तर तो लोकशाही मार्गाने सुटेल असं प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले होते.

पुढे 1983 मध्ये बेळगाव महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत मराठी भाषिकांनी सत्ता स्थापन केली. या महापालिकेसह सुमारे 250 गावांनी कर्नाटक सरकारला प्रस्ताव पाठवून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण कर्नाटक सरकारने ती धुडकावून लावली होती. नंतर 2005 मध्ये बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता असताना पालिकेत महाराष्ट्रात सामिल होण्याचा ठराव केला होता. त्यानंतर कर्नाटकने बेळगाव महापालिका बरखास्त केली. यावर महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर अजूनही निकाल लागलेला नाही. कर्नाटकने तयारीसाठी अजून अवधी मागितल्याने सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला सुनावले आहे. ही याचिका खूप वर्षे सुनावणीविना पडून आहे आता याला आणखी वेळ देता येणार नाही असं न्यायालय म्हणाले. 2006 मध्ये बेळगाववरील आपला दावा मजबूत करण्यासाठी कर्नाटकने बेळगावमध्ये पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन बोलावले होते. पुढे 2012 मध्ये तिथे 'विधानसौंध' नावाची विधानसभेची इमारत उभी केली. येथे दरवर्षी हिवाळी अधिवेशन बोलावले जाते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाKarnatakकर्नाटक