शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कर्नाटकच्या बसेसला खासगी पार्किंग मालकाने काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 8:46 PM

आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमातून शुक्रवारी अटक दररोज दिवसभर कर्नाटकच्या २० ते २२ तर रात्री सात बस या पार्किंगमध्ये उभ्या असतात...

ठळक मुद्दे स्वारगेट बसस्थानकाजवळच हे पार्किंग असल्याने त्याला पसंती दररोज दिवसभर कर्नाटकच्या २० ते २२ तर रात्री सात बस या पार्किंगमध्ये उभ्या असतात...

पुणे : कर्नाटकमध्ये साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी साहित्यिकांना केलेला मज्जाव तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ स्वारगेट येथील खासगी पार्किंग मालकाने कर्नाटक सरकारच्या सर्व बस बाहेर काढल्या. मागील तीन वर्षांपासून पुण्यात येणाऱ्या बस या पार्किंगमध्ये उभ्या केल्या जात होत्या. स्वारगेट येथे व्होल्गा हॉटेलशेजारी एका खासगी जागेवर कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळासह (केएसआरटीसी) खासगी कंपन्यांच्या बस पार्किंग केल्या जातात. दररोज दिवसभर कर्नाटकच्या २० ते २२ तर रात्री सात बस या पार्किंगमध्ये उभ्या असतात. मागील तीन-चार वर्षांपासून हे पार्किंग सुरू आहे. स्वारगेट बसस्थानकाजवळच हे पार्किंग असल्याने त्याला पसंती मिळते. पण मागील काही दिवसांत कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनांमुळे पार्किंग मालक विश्वास चव्हाण यांनी कर्नाटकच्या बस उभ्या करण्यास मनाई केली आहे. शनिवारपासून या बस उभ्या करता येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्टपणे सर्व चालक व वाहकांना सांगितले. त्यामुळे या बसला पार्किंगसाठी जागेच्या शोधाशोध करावी लागणार आहे. कर्नाटकमधील इदलहोंड येथे गुंफन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले श्रीपाल सबनीस व इतर साहित्यीकांना जाण्यास तेथील पोलिसांनी मनाई केली. त्यामुळे त्यांना संमेलनात सहभागी होता आले नाही. तर सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमातून शुक्रवारी अटक करण्यात आली. या घटनांच्या पार्श्वभुमीवर चव्हाण यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. महाराष्ट्र व कर्नाटक सीमावादाच्या मुद्दावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना बेळगावचे जिल्हाधिकारी साहित्यीकांना येण्यास मनाई करण्याची नोटीस बजावतात. ही हुकूमशाही आहे. मराठी बांधवांना त्यांच्या अधिकारापासून रोखले जात आहे. याचा निषेध करण्यासाठी कर्नाटकच्या बसला पार्किंग बंदी करण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.------------- स्वारगेट आगारात ये-जा सुरूस्वारगेट आगारामध्ये कर्नाटकच्या बस नियमितपणे ये-जा करत आहेत. तिथे त्यांना कोणतीही अडवणुक केली जात नाही. परमिट नसलेल्या बसला आगारात येऊ दिले जात नाही. आगारामध्ये बस अडविण्यावरून कोणताही गोंधळ झालेला नाही, अशी माहिती आगार प्रमुख सचिन शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेswargateस्वारगेटKarnatakकर्नाटक