पुणे:कर्नाटकातील हिजाब वाद सध्या देशभर चर्चेचा मुद्दा ठरत आहे. मुस्लीम समुदायाच्या मुलींना कॉलेजमध्ये हिजाब वापरल्याने कॉलेजमध्ये प्रवेशबंदी केली होती. त्यामुळे मुस्लीम समुदायातील मुलींना या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले होते. त्या मुलींना विविध स्तरांतून पाठिंबा व्यक्त केला जातोय. पुण्यातील राष्ट्रीय संस्था असलेल्या आयसरमधील (IISER) विद्यार्थी आणि प्राध्यपकांनी कर्नाटकच्या उडपीमधील मुस्लीम समुदायातील त्या मुलींना पाठिंबा दर्शविला आहे.
हिजाबबंदी विरोधातील याचिकांचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पेहराव परिधान करून महाविद्यालयांत येऊ नये, असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने आवश्यक आहे. गुरुवारी दिले. या याचिकांची पुढील सुनावणी येत्या सोमवारी (दि. १४) होणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयातील या याचिका तातडीने हस्तांतरित करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
काय आहे प्रकरण?
कर्नाटकातील एका महाविद्यालयाने हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना प्रवेशबंदी केली होती. मात्र हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे. त्या प्रकरणावरुन सध्या कर्नाटकात वादंग निर्माण झाला आहे. हिजाब घालणाऱ्या युवतींचा विरोध म्हणून काही संघटना भगवी शाल अंगावर घालून कॉलेजमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत.