पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. यामुळे उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात थेट लढत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांच्या विचार केला तर मविआच्या रविंद्र धंगेकरांनी आघाडी घेतल्याचे दिसतेय. पण हा लीड कमी असल्याने हेमंत रासने कमबॅक करू शकतात. त्यामुळे कसब्याची पोटनिवडणूक चुरशीची होत आहे.मतमोजणीच्या आठव्या फेरीपर्यंत मविआ उमेदवार रविंद्र धंगेकरांना ३० हजार ४६९ मते मिळाली होती. तर भाजपच्या हेमंत रासने यांना २७ हजार १७३ मते मिळाली होती. तर नवव्या फेरीनंतर धंगेकरांना मोठी आघाडी घेतली. नवव्या फेरीत धंगेकरांनी ४ हजार ७०० मतांची आघाडी घेतली होती. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. तिथे पहिल्या फेरीपासून रविंद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे दिसत आहेत.
कसब्यात निम्म्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. १० व्या फेरीनंतर रविंद्र धंगेकरांनी ४ हजार २६४ मतांची आघाडी घेतली आहे. दहव्या फेरीनंतर मविआचे रविंद्र धंगेकरांनी ३८ हजार २८६ मते घेतली आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांनी ३४ हजार २२ मते मिळाली आहेत.