Kasba By Election | प्रभाग क्रमांक १५, २९ ठरवणार कसब्याचा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:46 AM2023-02-28T10:46:30+5:302023-02-28T10:47:06+5:30

प्रभाग क्रमांक १५ आणि २९ मधील मताधिक्यावर कसब्याचा आमदार ठरणार ...

Kasba By Election Ward number 15 and 29 will be decided by the MLA of the town | Kasba By Election | प्रभाग क्रमांक १५, २९ ठरवणार कसब्याचा आमदार

Kasba By Election | प्रभाग क्रमांक १५, २९ ठरवणार कसब्याचा आमदार

googlenewsNext

पुणे : कसब्यात भाजपने ब्राह्मण उमेदवार दिला नाही म्हणून पेठांचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक १५मध्ये नाराजीमुळे अवघे ४० टक्के मतदान होईल हा अंदाज फोल ठरला. २०१९च्या निवडणुकीपेक्षा प्रभाग क्रमांक १५मध्ये यावेळी पाच टक्के म्हणजे चार हजार ५४० मतदान कमी झाले आहे. लोकमान्यनगर, नवी पेठ हा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक २९ मध्येही मागील निवडणुकीपेक्षा दोन हजार ९८९ मतदान कमी झाले आहे. त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार यावर विजयाची गणिते ठरणार आहेत. एकूणच प्रभाग क्रमांक १५ आणि २९ मधील मताधिक्यावर कसब्याचा आमदार ठरणार आहे.

कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीसाठी सकाळपासून संथगतीने मतदान सुरू होते. दुपारनंतर मतदार बाहेर पडले. सायंकाळी काही मतदान केंद्रावर रांगा लागल्या. त्यामुळे या निवडणुकीत ५०.०६ टक्के मतदान झाले. २०१९च्या निवडणुकीपेक्षा ते १.४४ टक्क्यांनी कमी आहे. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आज दिवसभर विजयाचे आखाडे मांडत होते. कसबा मतदारसंघात प्रभाग क्रमांक १५, १७, १८ हे संपूर्ण तर १६, १९ आणि २९ यांचा काही भाग येतो.

या मतदारसंघात प्रभाग क्रमांक १५ मध्ये सर्वाधिक म्हणजे ७१ हजार ७५६ मतदार आहेत. आतापर्यंत भाजपने या मतदारसंघात प्रभाग क्रमांक १५मधील भागातून नगरसेवक झालेल्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली आहे. हेमंत रासने या उमेदवारी देताना प्रभाग क्रमांक १५ मधील उमेदवार हा एक निकष लावला होता. कसब्यात २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये ४१ हजार ७७७ मतदान होऊन त्यापैकी सुमारे ६८ टक्के मत भाजप मिळून २१ हजार २९ मतांचे मताधिक्य मिळविले होते. मात्र पोटनिवडणुकीत या प्रभागात ५१.८९ टक्के म्हणजे ३७ हजार २३७ टक्के मतदान झाले आहे. गेल्यावेळेच्या तुलनेत चार हजार ५४० मतदान कमी झालेले आहे. लोकमान्यनगर, नवी पेठ भाग असलेला प्रभाग क्रमांक २९ मध्ये २०१९च्या निवडणुकीत २२ हजार १०९ मतदान झाले होते. पण आता या निवडणुकीत १९ हजार १२० मतदान झाले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा दोन हजार ९८९ मतदान कमी झाले आहे.

बालेकिल्लात भाजपला फुटला घाम

कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. पण या बालेकिल्ल्याच्या पोटनिवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी घाम फोडला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाने कसब्यात ठाण मांडले होते. या निवडणुकीत हरीपत्ती आणि लालपत्तीचे मोठ्या प्रमाणात वाटप झाले. त्यामुळे या निवडणुकीचे चित्र धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचे दिसले.

कसब्यात गुन्ह्यांचीच चर्चा जास्त

कसबा पोटनिवडणुकीतील घडामोडी मतदान झाल्यावरदेखील सुरू आहे. भाजप नेते गणेश बिडकर यांच्यावर मारहाणप्रकरणी पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसरीकडे भाजप उमेदवार हेमंत रासने तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावरदेखील आता पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही आचारसंहितेचा भंग केला आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्यावरदेखील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kasba By Election Ward number 15 and 29 will be decided by the MLA of the town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.