शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

Kasba Bypoll Result, BJP: कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 1:59 PM

गेल्या ३० वर्षांपासून कसब्यात होती भाजपाची सत्ता

Kasba Bypoll Result, Pune BJP: महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अनपेक्षित विजय झाला. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. कसबा विधानसभा मतदारसंघात मुक्ता टिळक हा आमदार होत्या. त्यांचे काही दिवसांपूर्वी कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. त्यानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यात भाजपाच्या पदरी अखेर निराशा आली. गेली ३० वर्षे या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व होते, पण यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला. यापूर्वी १९९१ पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळाला होता. रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत. जाणून घेऊया भाजपाच्या पराभवाची पाच महत्त्वाची कारणे- 

भाजपाच्या पराभवाची पाच कारणं...

१. रविंद्र धंगेकर स्ट्राँग आणि लोकप्रिय उमेदवार- भाजपाच्या ताब्यात असलेला कसब्याचा गड अखेर काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी काबीज केला. रविंद्र धंगेकर हे स्वत: पहिल्यापासूनच एक अतिशय सामर्थ्यवान आणि लोकप्रिय असे उमेदवार मानले जात होते. रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख होती. मनसेमध्ये अनेक महत्वाची पदे भूषवलेले रविंद्र धंगेकर कसब्यात मागील २५ वर्षांपासून नगरसेवक होते. 'जनतेतला माणूस' या ओळखीचा त्यांना फायदा झाला आणि त्यामुळेच त्यांना आताही पाठिंबा मिळाला. नगरसेवक असताना कधीही मदतीला धावून जाणारे अशी त्यांची ओळख असल्याने ते या निवडणुकीत 'फेव्हरिट' होते. रवींद्र धंगेकर यांनी यापूर्वी दोन वेळा निवडणूक लढवली होती. त्यामुळे विरोधकांचे पुढचे उमेद्वार धंगेकर असणार, याचा भाजपला अंदाज होता. धंगेकर हे अत्यंत तगडे, लोकप्रिय उमेद्वार आहेत, हे भाजपलाही ठाऊक होते.

२. महाविकास आघाडी एकत्र लढली- पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड अशा दोन पोटनिवडणुकांचे निकाल एकाच दिवशी समोर आले. त्यातील कसबाचा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली तर दुसरीकडे पिंपरीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला. पिंपरीत भाजपाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतापेक्षा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोर यांना मिळालेल्या मतांची बेरीज जास्त असल्याचे विश्लेषण विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केले. तसेच, पुढच्या वेळी बंडखोरी होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. कसब्यात हाच फॅक्टर महाविकास आघाडीसाठी फायद्याचा ठरला. भाजपाला थेट महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्रितपणे येऊन भिडले. याऊलट भाजपचे दिग्गज नेते या निवडणुकीत उतरले हे खरे, पण त्यांची सरबराई करण्यातच कार्यकर्ते आणि नगरसेवकांचा वेळ गेला. त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार झाला नसल्याचे चित्र दिसले. त्यामुळेच, बड्या नेत्यांना प्रचाराला उतरवूनही या विभागात भाजपाचा पराभव झाला. 

३. दुरंगी लढत झाल्याचा भाजपला फटका- भाजपाचा कसब्यातील आतापर्यंतचा इतिहास पाहता, भाजपाकडे गेली ३० वर्षे हा गड होता. कसब्यात गेली २५ वर्षे गिरीष बापट हे आमदार म्हणून निवडून येत होते, तर गेल्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांना आमदारकीचे तिकीट देण्यात आले होते. या साऱ्या बाबतीत महत्त्वाची बाब ठरली ती भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी हे थेट लढत. एका आकडेवारीनुसार, ब्राह्मण मतांची टक्केवारी निव्वळ 13% असतानाही कसब्यात आमदार ब्राह्मण राहिलेत. गिरीश बापट यांनी अठरापगड समाजाला सोबत घेऊन काम केले. नंतर मुक्ता टिळकांना तिकीट मिळाले असले तरी नियोजनात बापटांचा मोठा वाटा होता. पण मुक्ताताई टिळक या २८ हजार मतांनी म्हणजेच २० टक्के मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्याआधी २००९ ला गिरीश बापट हे अवघ्या पाच टक्के मतांनी निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यावेळच्या मनसेच्या रवींद्र धंगेकरांना तब्बल ३० टक्के म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. यानंतरच्या निवडणुकीत २०१४ लाही बापट जिंकले. त्यांचे मताधिक्य २० टक्क्यावर होते. पण बापटांना एकूण ४३ टक्के मते मिळाली होती आणि विरोधातल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना यांच्या उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज ५० टक्क्यांवर जात होती. याच पॅटर्न लक्षात घेत, महाविकास आघाडीने येथे दुरंगी लढत केली आणि त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला. त्यातच आजारी गिरीश बापट यांना प्रचारात आणले, पण उमेदवार ठरवताना त्यांना विश्वासात घेतले गेले नाही, अशीही चर्चा होती.

४. भाजपकडे लोकप्रिय चेहराच नव्हता- गेली ३० वर्षे जो विभाग भाजपाच्या ताब्यात आहे, तेथे भाजपाने गिरीष बापटांनंतर पुण्याचे महापौरपद भूषवण्याचा अनुभव असलेल्या मुक्ता टिळक यांना गेल्या वेळी मैदानात उतरवले होते. बापट आणि त्यानंतर टिळक हे दोनही चेहरे पुण्याच्या आणि कसब्याच्या लोकांच्या परिचयाचे होते. यांनी तळागाळातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली असल्यामुळे, ते त्या विभागात लोकप्रिय होते. पण मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनानंतर भाजपाला त्या विभागात लोकप्रिय चेहरा देता आला नाही. त्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकरांना पसंती दर्शवली. अनेक वर्षे नगरसेवक असलेले रविंद्र धंगेकर हे तुलनेने लोकप्रिय होते, त्याचा फायदा धंगेकर यांना आणि तुलनेने महाविकास आघाडीला झाला. भाजपकडे गिरीश बापट यांच्यासारखे सर्व स्तरात लोकप्रिय असणारे आमदार २५ वर्षे होते. गिरीश बापट अथवा मुक्ता टिळक यांच्यापैकी कोणीही २०२४चे उमेद्वार असू शकणार नाहीत, हे भाजपला ठाऊक होते. तरीही त्यांनी कोणतीही तयारी केली नाही. भाजपकडे उमेदवारच नव्हता, ही यातील सगळ्यात मोठी अडचण होती.

५. सरकार पडल्यामुळे महाविकास आघाडी आणि ठाकरेंना मिळालेली सहानुभूती- २०२२ मध्ये महाविकास आघाडीला मिळालेला 'जोर का झटका' हे देखील कसब्यातील भाजपाच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण असू शकते. महाविकास आघाडीच्या आणि तत्कालीन शिवसेनेच्या मतदारांचा एकनाथ शिंदे यांच्या कृत्यावर काही अंशी अजूनही रोष आहे. 'एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता ओरबाडून घेतली आणि त्यासाठी त्यांनी गद्दारी केली', अशा प्रकारचे चित्र महाविकास आघाडी आणि ठाकरे गट गेल्या ९-१० महिन्यांपासून उभं करू पाहत आहे. काही ठिकाणी या दाव्यांना भावनेची किनारही दिसून येते. अशा परिस्थितीत पुण्याच्या आणि विशेषत: कसब्यातील मतदारांना हा भावनिक मुद्दा जास्त रुचला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तशातच, ठाकरे यांनी मिळणारी सहानुभूती हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. उद्धव ठाकरे हे अतिशय संयमी आणि शांत स्वभावाचे असल्याने, एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय काही मतदारांना अजूनही पटलेला नाही. त्यामुळे असे मतदार, भाजपा समर्थक असले तरीही या तथाकथित 'गद्दारी'मुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपा-शिंदे गटाच्या उमेदवाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत असल्याचे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे