पुण्यात दोन मतदारसंघांत आज पोटनिवडणुकीचे मतदान सुरु आहे. अशातच येथील मतदारांना सुट्टी असल्याने त्यांना बाहेर जाऊ नका, मतदानाचा हक्क बजावा असे नेत्यांनी सांगितले आहे. आता मतदार पोटनिवडणुकीला किती हौशी असतात हे साऱ्यांनाच माहिती आहे. परंतू कसब्यातील एक अशी हौशी तरुणी आहे, जी साता समुद्रापाराहून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आली आहे.
पोटनिवडणूक: चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार- भाजपा समर्थक भिडले; पोलिसांसमोरच हाणामारी
अमृता देवकर महाजनने २४ तासांचा प्रवास केला आहे. यासाठी ती मुंबईत विमानाने आली होती. तिथून ती पुण्याला आली. घरी न जाताच तिने आधी मतदान केले. कसबा पोटनिवडणुकीत सकाळी नऊ वाजे पर्यंत 6.5 टक्के मतदान झाले. मतदानाला लोकांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे.
कसब्याची राहणारी अमृताने सकाळी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे. मला कसब्यात पोटनिवडणूक असल्याचे समजले आणि मी मतदानासाठी आले. मतदान करणे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे. देशाला पुढे नेण्यासाठी मतदान महत्वाचे आहे. यामुळे मी एवढे लांबून आल्याचे तिने सांगितले.