Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपच्या हेमंत रासने यांची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 08:29 AM2024-11-23T08:29:04+5:302024-11-23T09:56:10+5:30
Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live
Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेस महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि भाजप महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट लढत होत आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी भाजपच्या गडाला हादरा देत ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
आजच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच कसब्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. पहिल्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी ६४० मतांची आघाडी घेत भाजपला सुरुवातीला धक्का दिला. या फेरीत धंगेकरांना ५,२८४ मते मिळाली, तर रासने यांना ४,६४४ मते मिळाली होती.
इथे क्लिक करा > महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २ ० २ ४ -
मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये भाजपच्या हेमंत रासने यांनी जोरदार मुसंडी मारली. चौथ्या फेरीपर्यंत त्यांनी ६,४१५ मतांची आघाडी घेतली आहे. या आघाडीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर काँग्रेसकडे निराशेची छटा दिसत आहे.
कसब्याचा निकाल भाजपसाठी प्रतिष्ठेचा
कसब्यातील हा निकाल भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने मोठ्या प्रमाणावर ताकदीनिशी प्रचार राबवला होता. रासने यांचा विजय हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असून, धंगेकरांसाठी हा निकाल जनतेच्या विश्वासाची परतफेड मानला जात आहे.
कसबा मतदारसंघातील या चुरशीच्या लढतीचा निकाल पुण्यासह संपूर्ण राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतो. दुपारी तीनपर्यंत २० फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर अंतिम निकाल हाती येईल. आता रासने आपली आघाडी कायम ठेवतात की धंगेकर पुन्हा एकदा पुनरागमन करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.