शहरं
Join us  
Trending Stories
1
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’
2
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
3
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
4
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
5
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
6
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
7
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने शोधला एलियन्सचं वास्तव्य असलेला ग्रह, संशोधनानंतर केला दावा
8
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
9
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
10
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
11
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळाळेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
12
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
13
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
14
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
15
५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
16
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
17
जमिनीवर भिंतीवर आपटले, मन भरलं नाही म्हणून दगडाने ठेचले; श्वान प्रेमीने केली पाच पिल्लांची हत्या
18
रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' ३ गोष्टी; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा मोलाचा सल्ला
19
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
20
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 

Kasba Vidhan Sabha: कसब्यात रासने धंगेकरांपेक्षा श्रीमंत; २ उमेदवार बारावी, तर एक उमेदवार ८ वी पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:04 IST

हेमंत रासने तब्बल १८ कोटींचे धनी असून धंगेकर आणि भोकरेंपेक्षा श्रीमंत आहेत, शिक्षणात रासने व भोकरे बारावी, तर धंगेकर आठवी पास

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून, येथील भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर आणि मनसेच्या गणेश भोकरे यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचे त्यांनी दिलेल्या शपथपत्रातून स्पष्ट झाले आहे. रासने १८ कोटी ५४ लाख रुपये, तर धंगेकर ८ कोटी ६० लाखांचे धनी आहेत. तर भोकरे यांच्याकडे ३ कोटी ३० लाखांची मालमत्ता आहे. रासने व भोकरे बारावी, तर धंगेकर आठवी पास आहेत.

काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर

- एकूण मालमत्ता ८ कोटी ६० लाख ३३ हजार रुपये (धंगेकर यांच्याकडे रोख रक्कम ९१ हजार ६००, तर पत्नीकडे ७३ हजार २०० रुपये)कर्ज - धंगेकर - २३ लाख ७३ हजार रुपये

पत्नीच्या नावे - १९ लाख ३ हजार रुपयेव्यवसाय - शेती व सोने-चांदी कारागिरी, बांधकाम

शिक्षण - आठवीपर्यंतजंगम मालमत्ता - धंगेकर यांच्या नावे ६९ लाख ९६ हजार ४२ रुपये, पत्नीकडे - ७० लाख ५१ रुपये.

स्थावर मालमत्ता - धंगेकर यांच्या नावे - ४ कोटी ५९ लाख ६३ हजार ९५८ रुपये, पत्नीकडे - २ कोटी ६० लाख ७२ हजार ९९४ रुपये.वाहने व दागिने - धंगेकर यांच्याकडे दोन दुचाकी, दहा तोळे सोने, तर पत्नीकडे १५ तोळे सोने आहे. तसेच धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे शेती असून कोथरूड येथे साडेचार हजार चौरस फुटांची बिनशेती जागा आहे.

- एकूण १२ प्रलंबित खटले.

भाजपचे हेमंत रासने

एकूण मालमत्ता (स्थावर व जंगम) - १८ कोटी ५४ लाख ५१ हजार रुपये.

कर्ज - रासने यांच्या नावावर ९ कोटी ९७ हजार रुपयांचे कर्ज, तर पत्नीच्या नावावर १ कोटी ३८ लाख ५ हजार रुपयांचे कर्ज आहे. रासने यांच्याकडे रोख रक्कम १ लाख २ हजार ६९१ रुपये असून, पत्नीकडे ४५ हजार ४५८ रुपये रोकड आहे.उत्पन्न - शेती व व्यवसाय

शिक्षण - बारावीपर्यंतजंगम मालमत्ता - रासने यांच्या नावे - ७ कोटी १४ लाख ६१ हजार ६७८ रुपये, तर पत्नीकडे ८७ लाख ७७ रुपये.

स्थावर मालमत्ता - रासने यांच्या नावे - ७ कोटी ९८ लाख ६० हजार रुपये, पत्नीकडे २ कोटी ५३ लाख ५३ हजार रुपये.वाहने व दागिने - रासने यांच्याकडे दोन चारचाकी, दोन दुचाकी, दहा तोळे सोने, तर पत्नीकडे १८ तोळे सोने आहे.

- रासमे यांच्याकडे शहरात सदनिका तर कोकणात १३ एकर शेती आहे.- एकूण ३ प्रलंबित खटले

मनसेचे गणेश भोकरे

एकूण मालमत्ता (जंगम व स्थावर) - एकूण ३ कोटी ३० लाख ७६ हजार रुपये

कर्ज - १ कोटी ३१ लाख ७९ हजार रुपयेराेख रक्कम - ७० हजार ५०० रुपये, पत्नीकडे २५ हजरा ७०० रुपये

एकूण जंगम मालमत्ता - १ कोटी २९ लाख ३६ हजार ४६२, पत्नीकडे ५५ लाख ६९ हजार १६७ रुपये.कर्ज - १ कोटी ३१ लाख ७९ हजारे.

वाहने - दोन दुकाने व दोन सदनिका (एकूण किंमत १ कोटी ४५ लाख ७१ हजार रुपये), दोन चारचाकी व एक दुचाकी. तसेच त्यांच्याकडे ७ लाख २० हजारांचे सोने, तर पत्नीकडे १८ लाख ५९ हजार ८३२ रुपयांचे सोने आहे.गुन्हे - पाणीप्रश्नी आंदोलन केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे.

शिक्षण - बारावीपर्यंत झाले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ravindra dhangekarरविंद्र धंगेकरMNSमनसेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी