शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

Kasba Vidhan Sabha: कसब्याचा आमदार कोण? लढत तिरंगी, दोघांत तिसरा आल्याने मतांचं गणित बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 3:20 PM

धंगेकर मनसेत असताना प्रचंड मताधिक्य मिळवले असल्याने मनसेला कसब्यातून मतं मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

पुणे: पुण्यातील कसबा विधानसभेची पोटनिवडणूक संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली. धंगेकर आणि रासने दोघांचेही संपर्क त्यानंतर प्रचंड वाढले. एरवी सलग २८ वर्षे जिथे एकाच पक्षाचा झेंडा फडकत होता, तिथे पोटनिवडणुकीत एकदम दुसरा झेंडा लागणे शक्य नसते झाले पण हु इज धंगेकरने विषय बिघडला अन् काँगेसचे झेंडा फडकला. आगामी विधासभेतही कसब्याची निवडणूक चर्चेचा विषय ठरणार आहे. 

कसबा विधानसभेचे सध्याचे चित्र पाहता मागचेच स्पर्धक पुन्हा रिंगणात आहेत. म्हणजे २०२३ च्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, त्याच निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे हेमंत रासने अशीच ही लढत होणार आहे. पण आताची लढत दुरंगी नसून तिरंगी होणार असल्याचे दिसते आहे. कारण मनसेचे गणेश भोकरे या मैदानात उतरले आहेत. गणेश भोकरे हे तरुण नेतृत्व म्हणून मनसेकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा दांडगा संपर्क आहे. धंगेकर मनसे पक्षात असताना भोकरे आणि त्यांनी एकत्र कामेही केली आहेत. तसेच त्यांनी मनसेकडून विधानसभा लढवली तेव्हा प्रचंड मताधिक्य मिळवले होते. यावरून कसब्यात मनसेलाही मताधिक्य असल्याचे दिसते आहे. अशातच भोकरेंसारख्या तरुण नेतृत्वाला संधी द्या अशी मागणीही शर्मिला ठाकरे यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान केली होती. त्यामुळे या तिरंगी लढतीत मतांचं गणित नक्कीच बदलणार आहे.   

 पोटनिवडणुकीत धंगेकर ११ हजार मतांनी विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत रासने यांनी ही ११ हजारांची कसर भरून काढत वर ४ हजार मते जास्तीची पक्षाच्या उमेदवाराला मिळवून दिली आहेत. म्हणजेच लोकसभेला कसबा विधानसभा मतदार संघातून रवींद्र धंगेकर यांना सर्वात कमी मतं मिळाली होती. त्यामुळे धंगेकर यांच्यासमोर धोक्याची घंटा वाजली आहे.  ‘२४ तास उपलब्ध हे त्यांचे वैशिष्ट्य आहेच’, पण कोणासाठी? असा प्रतिप्रश्न आता विचारला जाऊ शकतो. तर हेमंत रासने यांनी पोटनिवडणुकीचा पराभव मनावर घेतला आहे. पराभवांनंतर ग्राऊण्ड लेव्हलवरून त्यांनी कामाला सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.  महाआरोग्य अभियान, लाडकी बहिण योजनेची नोंदणी मोहीम तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवला. भाजपने रासने यांच्यावर निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी कसब्यात मजबूत संघटना बांधणी केल्याने लोकसभा निवडणुकीत आपल्याच मतदारसंघात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर पिछाडीवर गेले. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जवळपास १५ हजारांचे मताधिक्य कसब्यात मिळवले. परंतु दुसरीकडे रासने यांना फार बिनधास्त राहून चालणार नाही. याचे कारण पोटनिवडणुकीत त्यांना स्व-पक्षात स्पर्धाच नव्हती. ती यावेळी झाली. पक्षाने त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली याची पक्षाकडेही काही कारणे असतीलच. एक तर तो पराभव पक्षाच्याही जिव्हारी लागला आहे, त्यामुळे पक्षीय स्तरावरही विजयासाठी प्रयत्न होणारच आहेत.

 बंडखोरीकडे दुर्लक्ष

काँग्रेसच काँग्रेसचा घात करते, असे म्हणतात. या मतदारसंघात ते खरे आहे का हे पाहावे लागेल. कारण शहराच्या प्रथम महिला महापौर असलेल्या कमल व्यवहारे यांनी बंडखोरी जाहीर केली आहे. इतर पक्षात बंडखोरी थांबवण्याचे पक्षश्रेष्ठींचे निरोप घेऊन स्थानिक पदाधिकारी धावाधाव करतात. मात्र इथे कसब्यात तसे काही झालेले दिसत तरी नाही. पक्षश्रेष्ठी तर दूरच, स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही व्यवहारे यांची बंडखोरी फारशी गंभीरपणे घेतलेली दिसत नाही. दुसरे मनसेचे तरुण उमेदवार गणेश भोकरे हे देखील स्पर्धेत आहेत. ते तरुण आहेत, पण त्यांची तडफदारी अजून सिद्ध व्हायची आहे, त्याआधीच त्यांना मैदानात उतरवले गेले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kasba-peth-acकसबा पेठPoliticsराजकारणravindra dhangekarरविंद्र धंगेकरMLAआमदारMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMNSमनसे