शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

कसबा आमचा हक्काचा...! पोटनिवडणुकीच्या रिंगणात संभाजी ब्रिगेड, उमेदवारही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 5:57 PM

संभाजी ब्रिगेडसाठी कसबा विधानसभा मतदारसंघ अस्मितेचा विषय

पुणे: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षे वर्चस्व असले तरीही पोटनिवडणुकीत काँग्रेसला संधी मिळाल्याचा इतिहास आहे. काँग्रेसही लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे. या  पोटनिवडणुकीच्या रिंगणात संभाजी ब्रिगेड उतरणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितले आहे. संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पाठिंबा देऊन कसबा पोट निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

शिंदे म्हणाले, कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. संभाजी ब्रिगेड ही निवडणूक लढवणार आहे. जिजाऊंचा लाल महाल आमच्यासाठी अस्मितेचा विषय आहे. संभाजी ब्रिगेडच्या पुणे शहराची संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. यामध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला, याला संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पाठिंबा देऊन कसबा पोट निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. कसबा विधानसभा मतदारसंघ हा अस्मितेचा विषय आहे. आमच्या विचारांचे रक्तामासांची माणसं याच मतदारसंघात राहतात. संभाजी ब्रिगेड साठी ही सुवर्णसंधी आहे. सर्व पक्षाचे आणि जाती-धर्माचे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प आज करण्यात आला.

असा आहे इतिहास

कसबा विधानसभा मतदारसंघ मागील अनेक वर्षे भाजपच्या ताब्यात आहेत. सलग ५ वेळा तिथून भाजपचे गिरीष बापट विजयी झाले. त्यांच्याही आधी अण्णा जोशी, त्याआधी अरविंद लेले या भाजपच्याच उमेदवारांनी तिथून निवडणूक जिंकली होती. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा जोशी लोकसभेची निवडणूक जिंकली व ते खासदार झाले. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर प्रथमच पोटनिवडणूक झाली.

काय झाले होते पोटनिवडणुकीत?

काँग्रेसकडून माजी महापौर वसंत थोरात व भाजपकडून गिरीश बापट यांच्यात लढत झाली. त्यामुळे थोरात यांनी बापट यांचा पराभव केला. काँग्रेसला मिळालेला या मतदारसंघातील तो पहिलाच विजय. तो पोटनिवडणुकीत मिळाला होता. आता तोच इतिहास पुन्हा घडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच सुरू झाली आहे.

निवडणूक २०१९ ची

मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा मुक्ता टिळक यांनी भाजपकडून पराभव केला. शिंदे यांना ४७ हजार २९६ मते मिळाली. मुक्ता टिळक यांनी ७५ हजार ४९२ मते मिळवली. शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे यांना १३ हजार ९८९ मते मिळाली. मुक्ता टिळक यांचा निवडणुकीत सहज विजय झाला होता. त्याच जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे.

आयोगाकडून दे धक्का

निवडणूक आयोगाकडून लगेचच या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. त्यामुळे भाजपच काय, पण अन्य राजकीय पक्षांमध्येही ही जागा लढविण्याबाबत किंवा उमेदवार निश्चित करण्याबाबत काहीच चर्चा नव्हती. मात्र, बुधवारी आयोगाने अचानक कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा रीतसर कार्यक्रमच जाहीर केला. त्यामुळे आता उमेदवारी कोण करणार याची चर्चा सुरू झाली आहे.

उमेदवारीबाबत सगळ्यांमध्येच अनिश्चितता

महाविकास आघाडीत अद्याप याबाबत अनिश्चितता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यांच्यात अद्याप याबाबत काहीच चर्चा नाही. खुद्द भाजपमध्येही उमेदवारीबाबत काहीच ठरलेले नाही. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठी याबाबत अंतिम निर्णय घेतली. त्यांच्याकडून काहीच कळविण्यात आलेले नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेच आहेत. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाने आदेश दिल्यास कसब्यातून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणेkasba-peth-acकसबा पेठElectionनिवडणूकsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडPoliticsराजकारण