पुणे : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाने कात्रज बसस्थानकांमधील बस मार्गांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला असून नवीन व्यवस्थेमुळे पीएमपी बस मार्गांमध्ये सोमवार (दि.२) पासून रात्री १२ नंतर बस मार्गात आणि बसस्थानकात बदल करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.नवीन बस मार्गांसाठी स्थानांतरण ठिकाणे :कात्रज कोंढवा रोड बसस्थानकावरून सुटणारे बस मार्ग क्र. अ १४०, १८८, २०९,२९१, के-१६ व एपी-२ या मार्गाच्या सर्व बसेस राजस सोसायटी चौकातून चालू राहतील. कात्रज बायपास बसस्थानकावरून सुटणारे बस मार्ग क्र. ४३, ४३ अ, ४४, ४५, २१४, व २२८ या मार्गाच्या सर्व बसेस वंडर सिटी समोरील सर्व्हिस रोड येथून चालू राहतील.कात्रज सर्पोद्यान बसस्थानकावरून सुटणारे बसमार्ग क्र. ६१, २९२, २९३, २९६,२९६ अ या मार्गाच्या सर्व बसेस गुजरवाडी बसस्थानकापासून चालू राहतील.कात्रज पोलिस चौकी बसस्थानकावरून सुटणारे बस मार्ग क्र २४, २४अ आणि २३५ या मार्गावरील कात्रज डेपोच्या बसेस कात्रज सर्पोद्यान बसस्थानकातून सुटतील व बसमार्ग क्र.२४अ आणि २३६ या मार्गावरील वाघोली डेपोच्या बसेस स्वारगेट मुख्य बसस्थानकातून सुटतील तसेच बसमार्ग क्र. १३०, २९०, के११, के-१२, के-१४ च के-१८ या मार्गावरील बसेस कात्रज पोलिस चौकी बसस्थानकांतून चालू राहतील.-कात्रज रोड बसस्थानकावरून सुटणारे बस मार्ग क्र. २अ, ११क, ३०१, ३०१अ, रातराणी बसेस कात्रज डेपोतून संचलनात राहतील.-गुजरवाडी-कात्रज बसस्थानकावरून सुटणारे बसमार्ग क्र. ४२, ९०, १०३, १०३म, २९८, २९९ व ३३९ या मार्गाच्या सर्व बसेस कात्रज दूध डेअरी जवळ असणाऱ्या कचरा डेपोपासून सुरू राहतील.- बसमार्ग क्र.४७, ५२ व ५२ अ या मार्गावरील सर्व बसेस सारसबाग बसस्थानकापासून सुरू राहतील.- बसमार्ग क्र.२९४, २९५ आणि २९७ हे उडाणपुलाच्या कामामुळे तूर्तास बंद ठेवण्यात येणार आहेत.
पीएमपीचा कात्रज बस स्टॉप राजस सोसायटीत स्थलांतरित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 12:44 PM