पुणे : शहरातील बहुचचित कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामासाठी टिळेकर नगर ते खडी मशीन या दरम्याची सुमारे दिड एकर जागा ताब्यात आली आहे. त्यामुळे या भागात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या मार्गातील एक अडथळा दुर झाला आहे.
कात्रज- कोंढवा रस्त्याचे भूसंपादन होत नसल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. अगोदर ८४ मीटरचा रस्ता करण्यात येणार होता. मात्र भुसंपादनासाठी लागणारा खर्च वाढत असल्यामुळे सुरुवातीला ५० मीटर रस्ता विकसीत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. रस्त्याच्या भुसंपादनासाठी २८० कोटींचा निधी लागणार आहे. राज्य सरकारने २०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. उर्वरीत ८० कोटी रुपये महापालिकेच्या अंदाजपत्रकामधून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.रस्ता विकसणासाठी खर्ची निविदा रक्कम वगळूण उर्वरीत निवदेसाठी ९०कोटींची आवश्यकता आहे अशी एकूण १७० कोटी आवश्यक आहेत.त्यामुळे महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी असलेल्या तरतूदीमधून ३० कोटी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भुसंपादनसाठीच्या हालचाली मोठयाप्रमाणात सुरू झाल्या.
कात्रज कोंढवा रस्त्यावरील टिळेकर नगर ते खडी मशीन या सर्वात महत्वाच्या टप्पा आहे. त्यासाठी जागा मालक प्रकाश धारिवाल यांच्याशी चर्चा करण्यात आली. पालिकेचे उपायुक्त महेश पाटील ,उप अभियंता बागवान,अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे,कार्यकारी अभियंता चव्हाण,उप अभियंता गायकवाड यांनी तडजोडीने प्रकाश धारिवाल यांच्याकडुन ताबा घेतला. त्यामुळे सुमारे दिड एकर जागा ताब्यात आली आहे. या जागेच्या ताब्यासाठी प्रकाश धारिवाल यांनी सहकार्य केले असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.