शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

कात्रज - कोंढवा रस्त्याचे काम संथगतीने सुरू !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 1:19 PM

सुमारे ४०हून अधिक बळी घेणाऱ्या या ८४ मीटर डी.पी. रस्त्यासाठी २०१२ पासून अनेक राजकीय आंदोलने करण्यात आली.

ठळक मुद्दे३६ महिन्यांची मुदत : १४९ कोटींच्या कामाला दीड वर्षात मिळाले फक्त ३० कोटीचाललेल्या संथगतीमुळे हे काम वेळेत पूर्ण होईल का, यामध्ये शंका निर्माण सुमारे ४ वेळा या रस्त्याची निविदा विविध कारणाने रद्द रस्त्यावर ग्रेड सेप्रेटर, सायकल ट्रॅक, अंडर बायपास असा अतिशय देखणा प्लॅन पालिकेकडून मंजूर

अभिजित डुंगरवाल कात्रज : मृत्यूचा सापळा म्हणून कुपरिचित असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचे संपूर्ण भूसंपादन न करता सुरू केलेले काम ३६ महिन्यांच्या मुदतीत संपेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, पालिका कर्मचारी जरी भूसंपादन झाले असल्याचे दावे करीत असले, तरी चाललेल्या संथगतीमुळे हे काम वेळेत पूर्ण होईल का, यामध्ये शंका निर्माण होत आहे.सुमारे ४०हून अधिक बळी घेणाऱ्या या ८४ मीटर डी.पी. रस्त्यासाठी २०१२ पासून अनेक राजकीय आंदोलने करण्यात आली. सुमारे ४ वेळा या रस्त्याची निविदा विविध कारणाने रद्द झाली. राजकीय श्रेयवादात अडकलेल्या या सुमारे ३ किमीच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना यामध्ये लक्ष घालावे लागले. तीन महामार्गांना जोडणारा हा रस्ता आता पुणे महानगरपालिकेचा पथदर्शी प्रकल्प म्हणून या रस्त्याचे काम सुरू केले आहे. या रस्त्यावर ग्रेड सेप्रेटर, सायकल ट्रॅक, झाडे, फुटपाथ, सर्व्हिस रोड, अंडर बायपास असा अतिशय देखणा प्लॅन पालिकेने मंजूर केला आहे. यासाठी पटेल इंजिनियर्स यांना १४९.५२ कोटी रुपयाला या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजनदेखील झाले. पहिल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९)  फक्त३ कोटी रुपये या रस्त्यासाठी देण्यात आले. आता या आर्थिक वर्षात (२०१९-२०)  ३० कोटी रुपये या कामासाठी देण्यात आले आहेत. म्हणजे, दीड वर्षाच्या कामासाठी फक्त ३३ कोटी पालिकेने दिले आहेत. तीन वर्षांच्या या प्रकल्पाच्या फक्त सुमारे २२ टक्केच रक्कम देण्यात आली आहे.या रस्त्याची पाहणी केली असता अजून पालिकेने ४० टक्के देखील जागा ताब्यात घेतलेली दिसत नाही; मात्र पालिका अधिकारी येथील ६२ टक्के जागा ताब्यात आल्याचा दावा करीत आहेत. हा रस्ता होणे ही काळाची गरज आहे. या रस्त्यामुळे येथील वाहतूककोंडी सुटणार आहे, या भागाचा कायापालट करणारा हा प्रकल्प ठरणार आहे, या रस्त्यावरील अपघातही कमी होतील; मात्र संथ गतीने चाललेल्या या कामामुळे पुन्हा नागरिकांच्या कररुपी भरलेल्या पैशाला कात्री लागून नये ही अपेक्षा आहे. कारण, प्रकल्प रेंगाळला की त्याची किमत वाढते व याचा फायदा फक्त ठेकेदाराला होत असतो. या रस्त्याचे काम रेंगाळण्यासाठी दोनच गोष्टी कारणीभूत ठरू शकतात, त्या म्हणजे रस्त्यामध्ये बाधित होणाºया जागेचे हस्तांतरण व निधीची कमतरता. या दोन्ही गोष्टींकडे पालिका आयुक्तांनी आताच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. नंतर जर या कारणांनी प्रकल्प रखडला व त्याची किंमत वाढली, तर कात्रजकरांना नेत्यांनी व पालिकेने फसविल्याची भावना तयार होईल. .......कात्रज- कोंढवा रस्त्याचे सुमारे ६२.५ टक्के जमिनीचे टीडीआरपोटी हस्तांतरण झालेले आहे. उर्वरित जागा ताब्यात घेण्यासाठी आमच्या जागामालकांशी सतत बैठका सुरूआहेत. हे काम वेळेत पूर्ण होईल हा आमचा प्रयत्न असेल.- सुनील कदम,  उपअभियंता, रस्ते विभाग ......पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेने  ७२ ब नुसार या कामांचे दायित्व घेतले आहे. ठेकेदार जेवढे काम करेल तेवढे पैसे देण्यास महानगरपालिका जबाबदार आहे. या रस्त्यासाठी पालिका पैशाची कमी पडून देणार नाही. येथील नागरिकांनी देखील रस्ता लवकर सुरू व्हावा, यासाठी सहकार्य करावे. - योगेश टिळेकर, आमदार 

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजKondhvaकोंढवा