लासुर्णे: कुरवली येथील ओढ्यात साखर कारखान्यांनी मळीमिश्रीत पाणी सोडले आहे. या मळीमिश्रीत काळ्या पाण्यामुळे नीरा नदीतील जलचर प्राणी मृत्यूमुखी पडणार असल्याने संबधित साखर कारखान्याला समज देऊन पाणी सोडण्याचे बंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व प्राणीमित्रांकडून केली जात आहे.
सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे.साखर कारखान्यातील मळीमिश्रीत पाणी येथील ओढ्यात सोडले जात आहे.या ओढ्याचे पाणी पुढे नीरा नदीला जाऊन मिळते. सध्या नदीत कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरल्याने नदी पात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे नदीपात्रात जलचर प्राणी जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. या मळीमिश्रीत पाण्यामुळे नदीतील जलचर प्राण्यांच्या जीवीतास धोका पोहचणार असल्याने संबधित विभागाने साखर कारखान्यांना सुचना देऊन साखर कारखान्यांच्या शेजारील ओढ्यात सोडण्यात येत असलेले मळीमिश्रीत पाणी थांबवण्यात यावे. तसेच या ओढ्याच्या शेजारी असणाऱ्या विहिरी तसेच विंधन विहरीत देखील हे मळीमिश्रीत पाणी पाझरून उतरून या भागात रोगराई पसरू शकते तसेच मानवी जीवीतास धोका पोहचु शकतो यासाठी हे मळीमिश्रीत पाणी साखर कारखान्यांनी प्रक्रिया करून सोडावे अशी मागणी होत आहे.
कुरवली येथील ओढ्यात सोडण्यात आलेले मळीमिश्रीत पाणी.
१२१२२०२०-बारामती-१३