शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

कवडीपाट टोलनाका जागा चुकली, १६ वर्षांनी ‘शोध’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 3:20 PM

कंपनीविरोधात गुन्हा दाखल; शेतकऱ्याच्या पाठपुराव्याला यश

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे काम दरम्यान पंचवीस किलोमीटर अंतराच्या रस्त्याची बीओटी तत्वानुसार उभारणी नुकसान भरून द्यावे यासाठी जनहित याचिका दाखल करणार

लोणी काळभोर : बीओटी तत्त्वावर उभारलेल्या चारपदरी रस्त्यावर टोलवसुलीसाठी उभारलेल्या कवडीपाट टोलनाक्याची जागा चुकली असल्याची जाणीव सार्वजनिक बांधकाम विभागाला तब्बल सोळा वर्षांनंतर झाली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील या नाक्याची जागा परस्पर बदलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गाची उभारणी करणाऱ्या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता श्रुती नाईक (वय ४३, रा. शनिवार पेठ पुणे) यांनी शनिवारी (दि. ७) रात्री लोणी काळभोर पोलिसात या कंपनीविरोधात शासनाची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. कवडीपाट येथील शेतकरी राहुल सोपान कदम यांनी या प्रकरणी केलेल्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला या चुकीची माहिती झाली आहे. विशेष म्हणजे कवडीपाट टोलनाक्यावर सोळा वर्षांपासून चालू असलेली टोलवसुली सहा महिन्यांपूर्वी थांबवली आहे. टोलवसुली थांबल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला टोलवसुलीची जागा चुकल्याची माहिती झाल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाची अवस्था ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी झाल्याची चर्चा नागरिकात चालू आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढती रहदारी लक्षात घेऊन, राज्य शासनाने कवडीपाट ते कासुर्डी (यवत ता. दौंड) या दरम्यान पंचवीस किलोमीटर अंतराच्या रस्त्याची बीओटी तत्वानुसार उभारणी केली होती. रस्ता आयर्न टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उभारला होता. कवडीपाट ते कासुर्डी दरम्यानच्या रस्त्याचा वापर करणाºया वाहनांकडून सोळा वर्षे टोल वसुल करण्याच्या परवानगीनुसार, कंपनीने महामार्गाचे चौपदरीकरण व मजबुती करण केले होते.  श्रुती नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ किलोमीटर अंतराच्या महामार्गाची उभारणी, देखरेख व टोलनाक्यांची जागा निश्चित करणे व आयर्न टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मदत करण्यासाठी शासनाने वाडीया टेक्नो इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली होती. कवडीपाट येथे नियोजित टोलनाक्याची जागा परस्पर बदलून या कंपनीच्या अधिकाºयांनी स्वत:च्या अधिकारात ५० मिटर पुढे नेली. यामुळे राहुल कदम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाले होते. राहुल कदम यांनी माहिती अधिकाराखाली तक्रार केली होती. उत्तरात वाडिया कंपनीने टोल वसुली नाक्याची जागा परस्पर बदलल्याचे निष्पन्न झाल्याने, संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला. ....

कवडीपाट ते कासुर्डी रस्ता काम सुरु झाल्यापासुन, गेली १६ वर्षे टोलनाक्याची जागा चुकीची असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. मात्र राजकीय दबावामुळे अन्याय केला होता. आवाज उठवल्याबद्दल पोलिसांच्या मार्फत खोटे गुन्हे नोंदवून कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याचाही प्रयत्न कंपनीने केला. मात्र , आता कंपनीवरच गुन्हा दाखल झाल्याने आम्हाला न्याय मिळाला आहे. आमच्या जागेत टोल वसुली नाका उभारल्यामुळे मागील सोळा वर्षे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे. बांधकाम विभागाने हे नुकसान भरून द्यावे यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहे.- राहुल कदम,तक्रारदार शेतकरी 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरtollplazaटोलनाकाhighwayमहामार्गGovernmentसरकार