पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने १२ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज २०२१ स्पर्धेत मुलांच्या गटात सातव्या मानांकित अर्जुन परदेशी याने, तर मुलींच्या गटात काव्या देशमुखने आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
महाराष्ट्र मंडळ टेनिस कोर्ट मुकुंदनगर या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित काव्या देशमुख हिने अव्वल मानांकित आस्मि टिळेकरचा टायब्रेकमध्ये ५-४ (२), ४-१ असा पराभव करुन विजेतेपदाला गवसणी घातली. काव्या ही डी. वाय. पाटील शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून पीसीएमसी कोर्ट, आकुर्डी येथे प्रशिक्षक मनोज कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील या गटातील तिसरे विजेतेपद आहे.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत सातव्या मानांकित अर्जुन परदेशी याने स्वर्णीम येवलेकरचा ४-२, ४-२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: मुले:
अर्जुन परदेशी(७) वि.वि.नमिश हूड(५) ७-२;
स्वर्णीम येवलेकर वि.वि.आर्यन किर्तने ७-२;
अंतिम फेरी: अर्जुन परदेशी(७) वि.वि.स्वर्णीम येवलेकर ४-२, ४-२;
मुली: उपांत्य फेरी:
आस्मि टिळेकर(१) वि.वि.स्वानिका रॉय ७-३;
काव्या देशमुख(२) वि.वि.ध्रुवा माने(३) ७-६ (५);
अंतिम फेरी: काव्या देशमुख(२) वि.वि.अस्मी टिळेकर(१) ५-४ (२), ४-१.