केडगाव, बोरीपार्धी ग्रामस्थांची पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:05 AM2018-08-31T00:05:31+5:302018-08-31T00:05:57+5:30
या राष्ट्रीय आपत्तीत केडगाव, बोरीपार्धी, चौफुला परिसरातील व्यक्तींनी आपापल्या परीने मदत केली. कोणी किती पैसे दिले, यापेक्षा संकटात सापडलेल्या माझ्या देशबांधवांना मदत करायची,
केडगाव : केडगाव व बोरीपार्धी ग्रामस्थांनी माणुसकीचा धर्म पाळून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी २ लाख ७० हजार रुपये किमतीचे १० टन तांदूळ पाठविले आहेत. तांदळाने भरलेला टेम्पो नुकताच रवाना झाला. मदतीचा हा तांदूळ रेल्वेने केरळमध्ये जाईल. त्यानंतर यवत येथील टेस्टीबाईट कंपनीचे कर्मचारी पूरग्रस्तांना मदत करतील.
या राष्ट्रीय आपत्तीत केडगाव, बोरीपार्धी, चौफुला परिसरातील व्यक्तींनी आपापल्या परीने मदत केली. कोणी किती पैसे दिले, यापेक्षा संकटात सापडलेल्या माझ्या देशबांधवांना मदत करायची, या भावनेने ही मदत करण्यात आली. या कार्याला परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांनी हातभार लावला. भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी याकामी पुढाकार घेतला. मदतीचा ट्रक रवाना करण्या प्रसंगी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की केडगाव परिसरातील ग्रामस्थांनी मानवता धर्म पाळत राष्ट्रउभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दौंडमधील इतर गावांनी याचा आदर्श घ्यावा. या वेळी किशोर सुंद्राणी यांनी मोफत कपडे, तर म्हेत्रे बुक एजन्सीच्या वतीने पेनांची मदत करण्यात आली. या प्रसंगी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, तानाजी दिवेकर, वामन जाधव, जयप्रकाश आगरवाल, संतोष शेलोत, शंकर चक्रवर्ती, डॉ. माणिक बोरकर आदी उपस्थित होते.
मदत निधीचे स्वरूप
लोकवर्गणीतून १,१६,३८० रुपयांची मदत
च्अनुराज शुगर्स यवत, आनंद थोरात, यशराज एंटरप्रायजेस, काकासाहेब थोरात पतसंस्था, केडगाव व्यापारी असोसिएशन, सुमीत टिळेकर यांच्याकडून प्रत्येकी १ टन तांदूळ.
च्धनलक्ष्मी पतसंस्था, बाळासाहेब कोळपे, तानाजी दिवेकर यांच्याकडून प्रत्येकी अर्धा टन तांदूळ