केडगाव तालुका दौंड ग्रामपंचायतीने कर वसुलीमध्ये आघाडी घेतली असून एकूण 70 टक्के कर वसुली झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुभाष डोळस यांनी दिली. खेडगाव ग्रामपंचायतीची एकूण वसुली 90 लाख 39 हजार रुपये असून चालू वर्षी 60 लाख 15 हजार रुपये गोळा झाले आहेत. या निमित्त केडगाव ग्रामपंचायतीचे परिसरामध्ये कौतुक होत आहे. तालुक्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ असणाऱ्या केडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अजित शेलार व ग्रामविकास अधिकारी सुभाष डोळस यांनी गेली महिन्याभरापासून कर वसूलीचे नियोजन केल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये यानिमित्त ग्रामविकास अधिकारी सुभाष डोळस यांचा सत्कार करण्यात आला.
उपसरपंच अशोक हंडाळ म्हणाले की, करवसुलीचे नियोजन केल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये स्वतःहून ग्रामस्थ कर संकलनासाठी येत आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकासाठी अधिकाधिक सेवा देण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.
यावेळी नितीन जगताप, सतीश बारवकर, गणेश पांढरे, प्रवीण भिसे, अभिजित गायकवाड, मंगेश मोकाशी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
केडगाव ग्रामपंचायतीमध्ये कर संकलन करताना उपसरपंच अशोक हंडाळ ग्रामविकास अधिकारी सुभाष डोळस व मान्यवर.