लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ही चांगली बाब आहे. मात्र अशा प्रकारचे कार्यक्रम दर तीन महिन्यांतून राबवून यामध्ये सातत्य ठेवा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केली.जिल्हा परिषद, कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक विभागाच्या वतीने स्व़ वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देवकाते बोलत होते़ या वेळी जिल्ह्यातील उत्कृष्ठ शेतकरी आणि शेतकरी गटांचा स्मृतीचिन्ह, व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला़ तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माहिती पुस्तीकेचे प्रकाशनही करण्यात आले़याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, कृषी अधिक्षक सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते़देवकाते म्हणाले की, जिल्ह्यात जिल्हा परिषद व विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ओढा खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातून पाणी अडवा व पाणी जिरवा ही संकल्पना साध्य होणार आहे त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने सिमेंटचे बंधारे बांधावेत़यंदा अर्थसंकल्पामध्ये सेंद्रीस शेतीसाठी अनुदान दीडपट करण्यात आले आहे. दरम्यान कृषी विभागास कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नसल्याचेही देवकाते यांनी नमूद केले़ या वेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सुजाता पवार आदींची भाषणे झाली़ सुभाष काटकर यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी आभार केले़..तर तुमचे कार्यक्रम तुम्हीच कराकृषी दिनानिमित्त कृषी सभापती सुजाता पवार यांच्या शिरुर तालुक्यात कार्यक्रम आयोजित करावा, असे त्यांना वाटत होते तसेच बारामती तालुक्यातीलही काही ग्रामस्थांना कार्यक्रम तिकडे आयोजित करावा असे वाटत होते. मात्र कृषी विभागातील अधिकारी हा कार्यक्रम पुण्यातच घ्यावा, यावर ठाम होते़ मात्र जिल्हा परिषदेला कुठे कार्यक्रम घ्यायचा हे ठरविण्याचाही अधिकार नसेल तर तुमचे कार्यक्रम तुम्हीच करा अशा शब्दात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी नाराजी व्यक्त केली़ तसेच तुम्ही टाळाटाळ कराल तर पालकमंत्री आणि कृषीमंत्र्यांशी पत्रव्यवहार करु असेही देवकाते यांनी सुनावले़
वृक्षलागवडीमध्ये सातत्य ठेवा
By admin | Published: July 02, 2017 1:53 AM