पुणे : केंद्रीय विद्यालयाच्या मुंबई विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या दहा दिवसांच्या ऑनलाइन सेवाकालीन शिबिराला सुरुवात झाली आहे. त्यात पुण्यासह विभागातील विविध केंद्रीय विद्यालयात प्राथमिक शिक्षक सहभागी झाले. शिबिरामध्ये ऑनलाइन शिक्षण पद्धती, नवीन शैक्षणिक धोरणा बद्दलची माहिती, एकविसाव्या शतकातील कौशल्य, लहान मुलांची शैक्षणिक व भौतिक वाढीचे उपाय, तंटामुक्ती अभियान, वर्ग व्यवस्थापन अशा विषयांवर मार्गदर्शन केले.
मुंबईतील झोनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन फॉर टीचर्स या इन्स्टिट्यूट तर्फे मुंबई विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन सेवा कालीन शिक्षकांचे शिबिर आयोजित केले. प्राचार्य केंद्रीय विद्यालय-२, एअरफोर्स स्टेशन लोहगावचे प्राचार्य गुरप्रीत सिंह यांनी शिबिराचे संयोजन केले. त्यासाठी हरमन चुरा, संजय पाटील, प्रफुलता शिंदे, उज्वला घनाटे यांनी परिश्रम घेतले.