केंदूर व परिसरात खूप मोठी लोकसंख्या असतानाही एटीएमसारखे सुविधा या ठिकाणी उपलब्ध नव्हती. सध्या गावात दोनच बँका कार्यरत असून लोकांचे व्यवहाराला विलंब होतो. त्यामुळे रांगेत उभे राहण्याची वेळ येत आहे. सध्या सर्वच व्यवहार, अनुदान, उसाचे बिल, कांद्याचे बिल ऑनलाइन होत असताना केंदूरमध्ये मात्र एटीएमसारखी सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे सेवा सुरू करण्यासाठी केंदूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला. यासाठी सरपंच सुवर्णा थिटे, उपसरपंच भरत साकोरे यांनी संचालक निवृत्ती अण्णा गवारे यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार पोपटराव गावडे, संचालिका वर्षा शिवले यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर केंदूरसाठी लवकरच एटीएम सुविधा देणार असल्याचे अध्यक्ष थोरात यांनी सांगितले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत थिटे, भाऊसो थिटे, सतीश थिटे व ग्रामस्थ उपस्थित होते.
केंदूरकरांना मिळणार आता एटीएमची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:15 AM