शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

पुण्यात ढोल ताशांच्या गजरात केसरी गणेशोत्सवाला सुरवात; टिळक पंचांगानुसार केसरीवाड्यात श्रींची प्राणप्रतिष्ठा

By श्रीकिशन काळे | Updated: August 20, 2023 13:18 IST

टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सप्टेंबरमध्येदेखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार

पुणे : ढोल ताशाच्या गजरात आणि पालखीत मिरवणूक काढून टिळक पंचांगानुसार आज (दि. २०) पासून केसरी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. शनिवार पेठेतील मूर्तिकार महेश गोखले यांच्याकडून प्रथेप्रमाणे सकाळी ९ वाजता ‘श्रीं’ची मूर्ती घेण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पालखीत गणराया विराजमान झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत बिडवे बंधूंचा सनई-चौघडा, श्रीराम व शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांचा समावेश होता.  

प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व ‘केसरी’चे विश्‍वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक,पोलिस आयुक्‍त रितेश कुमार, उपायुक्त संदिपसिंग गिल, ‘केसरी’च्या विश्‍वस्त व्यवस्थापिका व केसरी गणेशोत्सव कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. गीताली टिळक, केसरी गणेशोत्सवाचे प्रमुख व विश्‍वस्त-सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, ‘केसरी’च्या विश्‍वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, रौनक रोहित टिळक तसेच ‘केसरी’चे कर्मचारी व स्नेहीजन सहभागी झाले हाेते.

२० ते ३० ऑगस्ट दरम्यान हा गणेशोत्सव साजरा होत आहे. टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सप्टेंबरमध्येदेखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रथेप्रमाणे गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन न करता मूर्ती केसरीवाड्यातील गणेश मंदिरातच ठेवण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी) पासून पुन्हा गणेशोत्सवाला सुरुवात होईल. या गणेशोत्सवातही दर वर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.टिळक पंचांगानुसार व्रत वैकल्ये करणार्‍यांच्या घरी आज गणरायाचे आगमन होते. अन्य पंचांगाप्रमाणे सध्या निज श्रावण महिना सुरू आहे, तर पुढील महिन्यात १९ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी आहे.

रमणबाग चौक ते शिंदे पार चौक, ओंकारेश्‍वर मंदिरापासून वर्तक उद्यान, नारायण पेठ पोलिस चौकीमार्गे मिरवणूकीने केळकर रस्त्यावरून टिळकवाड्यात प्रवेश केला. त्यानंतर, सकाळी १२.३० वाजता ‘केसरी’ गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. रोहित टिळक व डॉ. प्रणती टिळक यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी पोलिस आयुक्‍त रितेश कुमार यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती झाली.

टॅग्स :Puneपुणेkesri wadaकेसरी वाडाGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवLokmanya Tilakलोकमान्य टिळक