पुणो : खडकवासला धरण काल रात्रीपासून आज दिवसभर झालेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. आज रात्री 8 पासून मुठा नदीतून जादा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. या विसर्गामुळे पावसाळी हंगामात मुठेच्या पाण्याचा फुगवटा प्रथमच वाढला आहे.
आज सायंकाळी 5 र्पयत धरणात 98.4क् टक्के पाणीसाठा होता. सायंकाळनंतरही पाऊस सुरू असल्याने धरणात रात्रीर्पयत 1क्क् पाणीसाठा होईल असा जलसंपदा अधिका:यांचा अंदाज आहे. सकाळपासून कालव्यातून 1326 क्युसेक आणि बंद पाईपलाईनमधून सव्वातीनशे क्युसेक पाणी सोडले जात आहे. रात्री 8 वाजता जलसंपदा विभागाच्या अधिका:यांच्या हस्ते जलपूजन करून नदीतून पाणी सोडण्यास सुरूवात झाली. दर सेकंदाला 2568 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते.
दरम्यान धरण शंभर टक्के भरल्यानंतर जे जादा पाणी धरणात येत राहिल ते नदीतून सोडले जाईल, असे सांगून या प्रकल्पाचे नियंत्रक अधिकारी एन.डी.गायकवाड यांनी धरणातील पाण्याचा येवा जसा असेल त्या प्रमाणात नदीत पाणी सोडले जाणार असल्याने नदीच्या सिमेंटच्या बांधार्पयत पाणी येऊ शकेल, असे सांगितले. सायंकाळी वरिष्ठ अधिका:यांशी झालेल्या चर्चेनंतर रात्रीच पाणी सोडण्याचा निर्णय झाला असेही ते म्हणाले. दरम्यान आज सायंकाळी 5र्पयत या प्रकल्पापैकी टेमघरमध्ये 62 पानशेतमध्ये 38 वरसगाव धरणात 34 आणि खडकवासला धरणात 18मिलिमीटर पाऊस झाला.सोमवारी रात्रीही पावसाचा जोर असल्याने या धरणांत अनुक्रमे 1क्1, 51, 49 आणि 19 मिलिमीटर पाऊस झाला होता.
या धरण साखळीत सायंकाळर्पयत 13.52 अब्ज घनफूट (46.39 टक्के) पाणीसाठा झाला आहे.टेमघरमध्ये 1.69 पानशेत धरणात 4.64 वरसगावमध्ये 5.25 तर खडकवासल्यात 1.94टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
(प्रतिनिधी)
च्पुणो जिल्हयात गेल्या 24 तासात जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पाऊस 5क् मिमीच्या वर पोहोचला होता. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी आनंदीत आहेत. सर्वाधिक 7क् मिमी पाऊस पडल्याची नोंद वडगाव मावळ येथे झाली.
च्पुणो शहरामध्ये सोमवारी पावसाचा जोर कमी होता. मात्र जिल्हयात पावसाला जोर होता. पौड येथे 6क् मिमी, वेल्हे येथे 4क्, जुन्नर येथे 4क्, भोर येथे 4क्, खेड येथे 2क्, आंबेगावमध्ये 2क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. दमदार पावसामुळे शेतक:यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हयातील धरणक्षेत्रंमध्येही जोरदार पाऊस पडत आहे.
कुकडी प्रकल्पातील पाणीसाठय़ात वाढ
नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रत गेल्या 15 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे धरणांच्या उपयुक्त पाणीसाठय़ात ब:यापैकी वाढ झाली आहे. 8 हजार 435 द़ ल़ घ़ फूट उपयुक्त पाणीसाठा वाढला असून 23 टक्के पाणीसाठा धरणांत आला आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ 1 चे कार्यकारी अभियंता शिवाजीराव बोलभट यांनी दिली़
पाच धरणांमधून 8435द़ श़ घ़ फूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी या दिवसाअखेर 2क्163 द़ श. घ़ फूट (66.क्3 टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता़ सर्व धरणांपैकी पिंपळगाव जोगा धरणात नव्याने 319 द़ श़ घ़ फूट उपयुक्त पाणी उपलब्ध झाले आहे. या धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के होता. आता 8.19 उपयुक्त पाणी उपलब्ध झाले आहे. जुन्नर तालुक्यातील पाच धरणांचा उपयुक्त पाणीसाठा व टक्केवारी, तसेच झालेल्या पावसाचे प्रमाण पुढील प्रमाणो : येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रमध्ये 1256 द़ श़ घ़ फूट (44.87 टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला असून, दिवसभरात 35 मि़ मी़ पाऊस झाला आह़े 1 जूनपासून आज अखेर 168 मि़ मी़ पाऊस या धरणक्षेत्रत झालेला आह़े पिंपळगाव जोगा धरणातून 14क्क् क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू असल्याने येडगाव धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. पिंपळगाव जोगा धरणातून 3 टीएमसी पाणी येडगाव धरणात आणून ते पाणी श्रीगोंदा, करमाळा, कर्जत या तालुक्यासाठी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे येडगाव धरणातील पाण्यासाठय़ाची टक्केवारी वाढली आहे. माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रमध्ये 2151 द़ श़ घ़ फूट (21.13 टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला असून, दिवसभरात 41 मि़ मी़ पाऊस झाला आह़े वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रमध्ये 552 द़ श़ घ़ फूट पाणीसाठा उपलब्ध झाला आह़े
पुण्यात दमदार
पुणो : गेल्या 2 दिवसांपासून शहरात संततधारपणो पडणा:या पावसाची तीव्रता आज वाढली. दिवसभर जोरदार पावसाने पुण्यासह उपनगरांना झोडपून काढले. शहराच्या मध्यवर्ती भागात सायंकाळी साडेपाचर्पयत 22 मिमी तर लोहगाव येथे 18.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. पुढील 24 तासात शहरात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणो वेधशाळेने वर्तविली आहे.
सोमवारी रात्रीपासून शहरात पावसाची तीव्रता वाढली. आज पुणोकरांच्या दिवसाची सुरूवात जोरदार पावसाने झाली. सकाळपासून जोरदार पाऊस लागून होता. अधून-मधून त्याची तीव्रता कमी होत होती पण अचानकपणो पुन्हा जोर वाढत होता. अशीच स्थिती दिवसभर होती. पावसाचा जोर जास्त असल्याने त्यासमोर रेनकोट, र्ज्िकगही तग धरू शकले नाहीत. त्यामुळे घराबाहेर पडलेले पुणोकर ओले होत
होते. जोरदार पावसामुळे गाडी चालविताना चालकांना पुढचे काहीच दिसत नव्हते.= कोंढवा, येरवडा, सिंहगड रस्ता, वडगाव धायरी, दापोडी, हिंजेवाडी, उपनगरांमध्येही दिवसभर दमदार पाऊस पडत होता. (प्रतिनिधी)