शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

खडकवासला प्रकल्प ८३, तर उजनी ४० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:12 AM

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूरसाठी महत्त्वाचे असलेल्या खडकवासला प्रकल्पात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ...

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूरसाठी महत्त्वाचे असलेल्या खडकवासला प्रकल्पात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४.२६ टीएमसी (८३.२१ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. तर पुणे, सोलापूर, अहमदनगरचा काही तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उजनी धरणात २१.७६ टीएमसी (४०.६१ टक्के) साठा जमा झाला आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी वीर, खडकवासला, कळमोडी, आंध्रा, वडीवळे ही धरणे यापूर्वीच भरली आहेत. सध्या कॅचमेन्ट भागातून येवा येत असल्याने या पाचही धरणांतून विसर्ग सुरू आहे. तर कासारसाई, निरा देवघर, गुंजवणी, पानशेत, भामा आसखेड, पवना, चासकमान, वरसगाव, मुळशी, डिंभे, येडगाव, भाटघर, टेमघर, वडज आदी १४ धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.

पुणे जिल्ह्यातील भीमा उपखोऱ्यात ६४.३२ टक्के, मुठा खोऱ्यात ८३.२१ टक्के, नीरा खोऱ्यात ८१.८० टक्के, तर सवार्त कमी पाणीसाठा कुकडी खोऱ्यात ४५.९५ टक्के इतका आहे. त्याचबरोबर टाटांकडे असणाऱ्या मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण आणि लोणावळा या पाच धरणांत ६३.१५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच बंडगार्डन येथून ११ हजार ७३१ क्युसेक तर दौंड येथून ९ हजार ५२७ क्युसेकने विसर्ग सुरू असून हे पाणी उजनी धरणात येत आहे.

----

चौकट

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणी साठ्याची माहिती

धरण - प्रकल्प साठा - सध्याचे टीएमसी-टक्केवारी

टेमघर ३.७१ २.५१ ६७.८१

वरसगाव १२.८२ २०.२० ७९.५७

पानशेत १०.६५ ९.५७ ८९.८४

खडकवासला १.९७ १.९७ १००

पवना ८.५१ ७.१५ ८४.००

कासारसाई ०.५७ ०.४८ ८५.४९

मुळशी १८.४७ १४.४० ७१.४५

कळमोडी १.५१ १.५१ १००

चासकमान ७.५८ ६.२७ ८२.७९

भामा आसखेड ७.६७ ६.२९ ८२.०६

आंध्रा २.९२ २.९२ १००

वडीवळे १.०७ ०.९२ ८६.१८

शेटफळ ०.६० ०९ १५.४१

गुंजवणी ३.६९ ३.४१ ९२.२९

भाटघर २३.५० १६.१६ ६८.७४

नीरा देवघर ११.७३ १०.८३ ९२.३६

वीर ९.४१ ९.१४ ९७.१७

नाझरे ०.५९ ०.०८ १३.९९

पिंपळगाव जोगे ३.८९ ०.१२ ३.०७

माणिकडोह १०.१७ ३.४० ३३.४५

येडगाव २.८० १.५३ ७८.६५

वडज १.१७ ०.६४ ५४.३३

डिंभे १२.४९ ८.६४ ६९.१४

चिल्हेवाडी ०.९६ ०.६३ ६५.४३

घोड ५.४७ १.३६ २७.९६

विसापूर ०.९० ०.०७ ७.६३

उजनी ५३.५७ २१.७६ ४०.६१