Khadakwasla Vidhan sabha assembly election result 2024 : हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर यांना पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तुपे यांनी ७,१२२ मतांनी विजयी आघाडी घेत मतदारसंघात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.२३ फेऱ्यांनंतर अंतिम आकडेवारी
- चेतन तुपे (राष्ट्रवादी - अजित पवार गट): १,३४,८१० मते (+७,१२२)
- प्रशांत जगताप (राष्ट्रवादी - शरद पवार गट): १,२७,६८८ मते
- साईनाथ बाबर (मनसे): ३२,८२१ मते
लढत चुरशीचीसुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये चेतन तुपे यांनी २५,००० पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली होती. मात्र, १८व्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य केवळ ३,००० पर्यंत खाली आले. यामुळे लढत अधिक चुरशीची झाली. मात्र, शेवटच्या फेऱ्यांमध्ये तुपे यांनी आपली आघाडी पुन्हा वाढवत ७,१२२ मतांनी विजय मिळवला.दोन्ही पवारांचे उमेदवार एकमेकांविरोधातहडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकमेकांविरोधात उभे होते. शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आणि अजित पवार गटाचे चेतन तुपे यांच्यातील थेट लढतीने या मतदारसंघाकडे राज्यभराचे लक्ष वेधले होते. मनसेचे साईनाथ बाबर यांची उपस्थितीही लक्षणीय होती.दरम्यान, चेतन तुपे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवत सलग दोनदा निवडून येण्याचा इतिहास रचला आहे. या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून येथून कोणताच उमेदवार सलग दोनदा निवडून येऊ शकला नाही. मतदारसंघाचा उमेदवाराला पुन्हा निवडून न देण्याचा पायंडा तुपे यांच्या विजयाने मोडला आहे.