मंचर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी व्हेंटिलेटरची कोरोना काळात अत्यंत गरज आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत,खडकी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंचर उपजिल्हा रुग्णालयाला एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिला आहे.यासाठी लागणाऱ्या आवश्यक रकमेचा धनादेश शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंबादास देवमाने यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.याप्रसंगी खडकी गावचे सरपंच कृष्णा भोर, खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, दीपक बांगर, उपसरपंच मयुरी वाबळे, विकास वाघमारे, दत्तात्रय भोर, अशोक भोर, अर्जुन बांगर, विकास पोखरकर, दादाभाऊ बांगर, बाळासाहेब पोखरकर, रोहिदास वाबळे, डी. जे. बांगर, राजू बांगर, राजू पोखरकर हे उपस्थित होते.
खडकी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उपजिल्हा रुग्णालयाला दिले व्हेंटीलेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:11 AM