दौंड पंचायत समितीचे उपसभापती सयाजी ताकवणे, माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब भोसले, भीमा पाटसचे माजी संचालक राजकुमार मोटे यांनी आपल्या मनोगतातून डी. के. खळदकर यांच्या कार्याचा आढावा घेतला व आठवणी जागवल्या. याप्रसंगी कर्मयोगी कारखान्याचे संचालक महादेव जगताप, नानासाहेब फडके, सुभाष बोत्रे, लक्ष्मण दिवेकर, सोमनाथ ताकवणे, जयदीप सोडनवर, सुरेश सुदाम गोरखे, रमेश नांदखिले, काका खळदकर, रमेश बोत्रे, काळूराम बोत्रे, नानगावचे चंद्रकांत खळदकर, भीमा पाटसचे संचालक आबासाहेब खळदकर, विश्वास भोसले, उपसरपंच संदीप खळदकर, दशरथ खळदकर, जालिंदर काळे, सचिन शिंदे, विष्णू खराडे आदी उपस्थित होते.
डी. के. खळदकर यांच्या स्मरणार्थ वसुधा सेवाभावी बहुउद्देशीय संस्था व खळदकर कुटुंबीयांच्या वतीने दहा कोविड सेंटरला पीपीइ किट, प्रोटेक्शन गाऊन, स्टेथसस्कोप, थर्मामीटर व सेंच्युरियन प्रूप साहित्य भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी पांडुरंग खळदकर, रवींद्र खळदकर, डॉ. भरत खळदकर, डॉ. विशाल खळदकर, मयूर खळदकर यांनी उपस्थितांचे ऋण मानले.
---
फोटो क्रमांक- ०७ केडगाव खळदकर
फोटो ओळी : नानगाव येथे कै. डी. के. खळदकर यांच्या स्मरणार्थ खळतकर कुटुंबीयांनी उभा केलेले दशक्रिया विधी निवारा शेड.
--