सुपे : बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील जिरायती पट्ट्यात यावर्षी पावसाअभावी खरीप आणि रब्बीची नापेर स्थिती झाल्याने, दोन्ही हंगाम वाया गेले असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. या परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. त्यामुळे शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. मात्र राज्यशासन या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करुन शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. परिसरात खरिपाचा हंगाम नापेर झाला आहे. त्यामुळे कसाबसा रब्बी हंगाम हाताला लागेल या आशेवर येथील शेतकरीवर्ग होता. मात्र रब्बी हंगामातील इतर सर्वच नक्षत्रे कोरडी गेली असून, अद्याप दमदार पाऊस झालेला नाही.
दरवर्षी या वेळी येथील रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीची कामे उरकून शेतकºयांची गहू पेरणीची लगबग सुरु असते. मात्र पुरेसा पाऊस झाला नसल्याने ज्वारीसह इतर पेरण्या रखडल्या आहेत. या परिसरात कुठेच दमदार पाऊस झाला नसल्याने विहिरी व कूपनलिका आताच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर गंभीर होत चालला आहे. मागील काही महिन्यांपासून दौंड भागातून ऊस आणून शेतकरीवर्ग जनावरे जगवित होता. मात्र काही शेतकरीवर्ग दररोजच्या चाºयामुळे वैतगला असल्याने जनावरे विकण्याच्या मार्गावर आहे. मात्र गिºहाईक नसल्याने त्यांना किमतही येत नाही.परिसरतील बोरकरवाडी हे कांद्याचे आगार समजले जाते. या परिसरातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याची पेरणी तसेच कांदा लागवड करीत असतात. यावर्षी पाऊस होईल या आशेवर काहींनी कोरडीलाच कांदा लागण केलेली होती. तसेच काहींनी कांद्याची लागवड केली आहे. आॅक्टोबरमधील हिट आणि वातावरणातील बदल यामुळे येथील कांद्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा जळून जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच काही कांद्यावर फुलकिडी पडली असल्याची माहिती शेतकºयांनी दिली. या परिसरात कांदा लागवडीसाठी साधारण २० ते २२ हजार खर्च झालेला आहे. त्यामुळे पाऊस झाला तरच शेतकºयांच्या हातात काही मिळेल अन्यथा झालेला खर्च, कष्ट वाया जाणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. या परिसरातील प्रत्येक गावातून पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने शासनाने त्वरित पिण्याच्या पाण्याची सोय तसेच जनावरांची छावणी करण्याची मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.बारामती तालुक्यातील सुपे परगण्यातील जिरायती पट्ट्यात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळ जाणवत आहे. जनावरांना चाराटंचाई असून, येत्या जानेवारीतच पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे या जिरायती पट्ट्यातील देऊळगाव रसाळ, नारोळी, कोळोली, दंडवाडी, सुपे, कुतवळवाडी, वढाणे, भोंडवेवाडी, काळखैरेवाडी, शेरेवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी आदी परिसरात तीव्र दुष्काळ जाणवत आहे. येथील विहिरी, नाले, तलाव, ओढे कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चाºयाची व्यवस्था होणे आवश्यक आहे.पाण्यासाठी अधिकाºयांना दिले शेतकºयांनी निवेदनराज्यशासनाने बारामती तालुका दुष्काळसदृश म्हणून जाहीर केलेला आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिले आहे. त्यामुळे बारामती तालक्यातील जिरायती भागात पिण्यासाठी शासकीय खर्चाने तातडीने तलावात पाणी सोडण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव वाघ यांनी केली आहे. या निवेदनावर सुमारे दोनशे शेतकºयांनी सह्या केल्या आहेत. यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. चोपडे, बी. के. शेटे यांना माहितीसाठी प्रत पाठवली आहे.
बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील जिरायती भागातील तलाव कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची तीव्र टंचाई झाल्याने या दुष्काळी परिस्थितीत जनाई सिंचन योजनेंतर्गत तलावात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी सुपे परगण्यातील शेतकºयांनी केली आहे.