अनुदानाच्या अंतर्गत अन्नधान्ये, कडधान्ये व इतर जीवनावश्यक वस्तूंचे किट आदिवासी कुटुंबीयांना देण्यात आले. या वेळी प्रकल्प अधिकारी, आलेगाव पागाचे सरपंच आप्पासाहेब बेनके, उपसरपंच लीलाबाई भोसले, ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, राजेंद्र गुळवे, तुकाराम बेनके, संजय गायकवाड, छबू माळी, पंढरीनाथ धुळे, योगिराज मोरे आदी उपस्थित होते.
आदिवासी समाजातील कुटुंबांना पावसाळ्यात रोजगार मिळणे कठीण होते. त्यांच्या हाताला कामे नसते. याचाच विचार करून शासनामार्फत अदिवासी कुटुंबाला खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळत असतो. आज आलेगाव - आरणगाव ग्रुप ग्रामपंचायतीमधील २१ कुटुंबीयांना प्रत्यक्ष लाभ मिळाला. गावाच्या वतीने सरपंच आप्पासाहेब बेनके यांनी या योजनेचे लाभार्थी यांना समक्ष घरी जाऊन किट वाटप करण्याऱ्या अधिकारी वर्गांचे कौतुक केले.
130821\img-20210813-wa0184.jpg
खावटी अनुदान योजना ठरतेय आदिवासीयांचा आलेगाव पागा ता शिरूर येथे आधार