पुणे : खेड, जुन्नर तसेच पुरंदर तालुक्यातील राजेवाडी परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या, तर जुन्नर शहरात तुरळक गारा पडल्या. यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली होती. आकाशात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आल्याने जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र संध्याकाळच्या वेळेला वादळी वाऱ्यासह जुन्नर तालुक्याच्या तसेच खेड तालुक्याच्या काही भागांत पाऊस पडला. जुन्नर शहरात काही वेळ गाराही पडल्या. पावसामुळे शेतात असलेले व आळेफाटा बाजारात विक्रीस आलेले कांदे झाकण्यासाठी अडतदार व्यापारी यांची धांदल उडाली. (वार्ताहर)वाड्यात बरसल्या हलक्या सरीवाडा : वाडा (ता. खेड) येथे हलक्या सरी बरसल्या. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. नेहमीपेक्षा या वेळेस उन्हाळा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. येथे पावसाच्या हलक्या सरी पडल्याने परिसरात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला आहे.
खेड, जुन्नरला हलका पाऊस
By admin | Published: May 09, 2016 12:50 AM