शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
2
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
3
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
4
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
5
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
6
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
7
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
8
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
9
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
11
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
12
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
13
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
14
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
15
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
16
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
17
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
18
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
19
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
20
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के

खेड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक; चार दिवस उलटल्यानंतर देखील कोरोना चाचणी अहवाल प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 9:25 PM

रिपोर्ट अद्यापपर्यत न आल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्युटी करायची की क्वारंटाईन व्हायचे हा प्रश्न

राजगुरुनगर: चार दिवस उलटूनही खेड पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांचे कोरोना रिपोर्ट न आल्यामुळे पोलिस कर्मचारी घाबरून गेले आहे. खेड पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.परंतू त्यांचे रिपोर्ट अद्यापपर्यत न आल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्युटी करायची की क्वारंटाईन व्हायचे हा प्रश्न पडला आहे.सहा दिवसांपूर्वी खेड पोलिस ठाण्यातील अधिकारी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली होती. गेले चार महिने या अधिकाऱ्याने लॉकडाऊन काळात तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्व:ता रस्त्यावर उतरुन नागरिकांना कोरोनाविषयी आवाहन व मार्गदर्शन केले होते.तालुका स्तरावर पोलिस पाटील यांच्या बैठका घेऊन कोरोना बाबत गावागावात काळजी घेण्याचे सांगितले होते.तसेच कंटेनमेंट झोन याठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात यशस्वी झाले होते. मात्र त्यांची तब्येत अचानक बिघाडल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते तत्काळ अ‍ॅडमिट झाले होते. त्यांची तब्येत ठणठणीत आहे. मात्र पोलिस ठाण्यातील जे पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी त्यांच्या संपर्कांत आले होते. त्यांनी शनिवार ( दि १८ जुलै ) रोजी चांडोली (ता. खेड ) येथील कोविड सेंटरमध्ये स्वॅब दिले होते.मात्र, अद्यापपर्यत न आल्यामुळे संपर्कात  आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस ककर्मचाऱ्याची धाकधुक वाढली आहे. स्वॅब दिलेल्या पोलिसांनी नागरिकांमध्ये जाऊन गर्दी हटवायची की,क्वारंटाईन व्हायचे, हा प्रश्न पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कोरोना रिपोर्ट न आल्यामुळे पडला आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस कर्मचार्‍यांचे रिपोर्ट तरी वेळेवर येणे गरजेचे आहे असे पोलिस उपनिरिक्षक निलेश बडाख यांनी सांगितले आहे.

.............................................................

चांडोली ग्रामिण रुग्णालयात केविड सेंटर मध्ये काही पोलिसांचे स्वॅब शनिवारी व सोमवारी घेतले आहे. सगळीकडे लोड असल्यामुळे रिपोर्ट येण्यास चार दिवस लागत आहे. यापूर्वी कोरोना रिपोर्ट २४ तासाच्या आतमध्ये येत होते. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याचे घेतलेले स्वॅब आज दि. २१ रोजी लॅबमध्ये कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.डॉ बळीराम गाढवे, तालुका वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस