तालुक्यातील चाकण, आळंदी, राजगुरूनगर नगर परिषदा व त्याजवळील गावांमध्ये कोरोनाचा समूह संसर्ग सुरु आहे. खेड तालुक्यात २४ तासांत चाकण ५०, आळंदी १८, राजगुरूनगर ३३ या नागरपरिषदांसह मेदनकरवाडी २८, नाणेकरवाडी २०, चऱ्होली खुर्द १०, चिंबळी १०, कडाचीवाडी १४, खराबवाडी १२, चांडोली ४, कडूस २, वडगाव पाटोळे १, आंबेठाण ६,बोरदरा १, खालूंब्रे १, कुरूळी ३, म्हाळुंगे ७, मोई २, निघोजे ५, शिवे १,वासुली २, वाकी खुर्द १, पाईट १, कोरेगाव बुद्रुक ६, कुरकुंडी १, किवळे १, होलेवाडी १, जैदवाडी १, खरपुडी खुर्द १, मांजरेवाडी १, राक्षेवाडी १, सांडभोरवाडी २, सातकरस्थळ २, शिरोली १,तिन्हेवाडी १, वाकी बुद्रुक २. भोसे ७, गोलेगाव १, काळूस ३, केळगाव २, रासे २, शेलगाव १, शेलपिंपळ्गाव ५, सोळू २, वडगाव घेणंद २, वाडा १, कडधे २, दावडी १ गुळाणी १, कनेरसर २, निमगाव ४, वरुडे २, वाफगाव ३ असे तीन नगरपरिषदा व ५० गावे मिळून २९४ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीणमधील खेड तालुक्यातील ही सर्वाधिक संख्या आहे.