कळमोडी धरणाचे ०.८७ टीएमसी पाणी उपसा योजनेला व १.०१ टीएमसी पाणी चासकमान धरण पुनर्भरणासाठी राखीव ठेवले आहे. सध्या सर्व पाणी चासकमान धरणात सोडले जाते.
कळमोडी योजनेचा सुधारित प्रशासकीय मान्यता, वाढीव क्षेत्राला मान्यता याबाबत शासनाने पुढाकार घेऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला न्याय तसेच शासनाला जागे करण्यासाठी कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे वतीने १ मार्चला आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असून मुंबई पोलिसांनी परवानगी दिली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अशोक टाव्हरे यांनी सांगितले.
सातगाव पठार व खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांसाठी पुर्वी मंजूर झालेल्या उपसा जलसिंचन योजनेत सुरूवातीला खेड तालुक्याच्या पुर्व भागातील कनेरसर, पुर, वरूडे, वाफगाव या गावातील ८४३ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले. नंतर दोन वर्षांपूर्वी माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी थिटेवाडी धरणापर्यंत वाढीव दोन हजार हेक्टर क्षेत्रासाठी सर्वेक्षण करून दोन वर्षात योजनेचे पाणी शेतावर येईल अशी घोषणा केली होती. परंतु वाढीव क्षेत्र मुळ क्षेत्रापेक्षा १०%हून जास्त असेल तर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मान्यता आवश्यक असते . दोन वर्षात फक्त सर्वेक्षण झाले.
-
वळसेच्या प्रयत्नांनीही यश नाहीच
गेल्र्षल्या फेब्रुवारीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित कळमोडी योजनेसाठी मंत्रालयात बैठक झाली होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे अधिकारी यांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही.
--