खोर येथील महादेव मंदिर, श्री राम मंदिर, श्री काळभैरवनाथ मंदिर व तुकाई माता मंदिर परिसरात होळीचा सण करण्यात आला. यावेळी घरोघरी पुरण पोळीचा नैवद्य करण्यात आला होता. होळीचा सण झाल्यानंतर अवघ्या ९ दिवसांनी खोर यात्रेला प्रारंभ होत असतो. मात्र कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील खोरचा यात्रा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी फक्त देवांचा नैवद्य व मंदिर परिसर विद्युत रोषणाई, श्री काळभैरवनाथ अष्टमी, पीर साहेबांचा संदल कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून कुठल्याही प्रकारचे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन न करता साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रसंगी संदीप अडसूळ, भगवान चौधरी, दिलीप डोंबे, राजेंद्र चौधरी, अनिल चौधरी, योगेश शिंदे, मयूर साळुंके, रविंद्र अत्रे, मारुती फरतडे, सुनील चौधरी, दिनकर चौधरी, तेजस चौधरी, पोलीस पाटील मच्छिंंद्र लवांडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो : २९खोर होळी
फोटो ओळ : खोर (ता.दौंड) येथे होळी सणपारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. मानाचे मुकदम राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली.