गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. वापराच्या पाण्याची अडचण भासू नये म्हणून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
गावात पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका तसेच खासगी फिल्टर प्लांट आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्यातरी जाणवत नाही. मात्र, वापरण्याच्या पाण्यासाठी तीन दिवसांआड दोन टँकरने पाणीपुरवठा केला जात आणि तो देखील स्वखर्चातून या टँकरच्या खर्चाचा कुठलाही आर्थिक भार ग्रामपंचायतीवर ठेवलेला नाही. लवकरच पाणीपुरवठ्याची पाईपलाईन दुरुस्त होऊन गावाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे सरपंच वैशाली अडसूळ यांनी सांगितले. दरम्यान, गावात पाणी टँकरच्या खेपांना सुरुवात झाली. त्या वेळी बापू अडसूळ, रामचंद्र चौधरी, बाळासो डोंबे, दिलीप डोंबे, दिनकर चौधरी, योगेश शेंडगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.