शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

खूशखबर : यंदाही देशात चांगला पाऊस, दुष्काळाचे अरिष्ट ओढवणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 6:19 AM

यंदा लागोपाठ दुसऱ्या वर्षी देशात नैऋत्य मान्सूनचा पाऊस समाधाकारक होईल, अशी खुषखबर हवामान खात्याने दिली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशात मान्सूनचा सरासरी ८९ सेंमी पाऊस होतो.

- हवामान खात्याचा अंदाजपुणे : यंदा लागोपाठ दुसऱ्या वर्षी देशात नैऋत्य मान्सूनचा पाऊस समाधाकारक होईल, अशी खुषखबर हवामान खात्याने दिली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशात मान्सूनचा सरासरी ८९ सेंमी पाऊस होतो. यंदा त्याच्या ९७ टक्के पावसाचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तविला. गेल्या वर्षी सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला होता. अंदाजात ५ टक्क्यांची वाढ वा घट गृहित धरलेली असली तरी यंदा दुष्काळाचे अरिष्ट ओढवणार नाही, अशी हवामान खात्याला खात्री वाटते.हवामान खात्याचे महासंचालक के.जे. रमेश यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. केरळमध्ये पावसाचे आगमन नेमके केव्हा होईल व जुलै आणि आॅगस्ट या महत्त्वाच्या दोन महिन्यांत मान्सूनचा विस्तार देशभरात कसा व कुठपर्यंत होईल याचे अंदाज दुसºया टप्प्यात जाहीर केले जातील. स्कायमेट या खासगी संस्थेनेही काही दिवसांपूर्वी मान्सून १०० टक्के बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसाच अंदाज हवामान खात्यानेही वर्तविल्याने समाधानकार पावसाची आशा दुणावली आहे.मान्सूनचा अंदाज सांख्यिकी मॉडेल व ‘डायनॅमिकल मॉडेल’ अशा दोन प्रकारे व्यक्त केला जातो. सोमवारी व्यक्त केलेला अंदाज दुसºया मॉडेलनुसार केलेला आहे.

- सरासरीच्या 97% पाऊस होणारकेरळमधील आगमनचा अंदाज मे महिन्याच्या मध्यात वर्तवणार. जुलै व आगस्टमधील पाऊस तसेच प्रत्येक हवमान विभागीत अपेक्षित पावसाचा अंदाज जूनमध्ये.पुणे मॉडेलचा अंदाज ९९ टक्क्यांचापुण्यातील हवामान विभागात मान्सून मिशन अंतर्गत नवे मॉडेल विकसित करण्यात आले आहे़ त्यानुसार २०१७ पासून अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात झाली आहे़ यानुसार यंदा देशभरात दीर्घकालीन काळात ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात ५ टक्के वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे़जून ते सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता; ५ श्रेणीत वर्गीकरणपावसाचा अंदाज शक्यता९० टक्क्यांपेक्षा कमी १४ टक्के९० ते ९६ टक्के ३० टक्के९६ ते १०४ ४२ टक्के१०४ ते ११० १२ टक्के११०%पेक्षा जास्त २ टक्केयानुसार मान्सून कालावधीत पाऊस सामान्यांपेक्षा अधिक होण्याची शक्यता असून कमी पावसाची शक्यता खूपच कमी असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़अंदाज आणि प्रत्यक्ष पडलेला पाऊसवर्ष स्कायमेट आयएमडी प्रत्यक्षात2018 100% 97% -2017 95% 96% 95%2016 105% 106% 97%2015 102% 93% 86%2014 94% 95% 88%2013 103% 98% 106%

 

टॅग्स :Rainपाऊस