शिरूर/टाकळी-हाजी : शिरूर येथील एका नामांकित डॉक्टरला पेशंट तपासण्याच्या बहाण्याने अपहरण करुन सोडण्यासाठी सुमारे तीन लाखाची खंडणी घेतल्या प्रकरणी आठ जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ.संदीप तुळशीराम परदेशी (वय 59 वर्ष, व्यवसाय, वैदयकीय व्यवसायिक, रा. यशोदीप मारुती आळी शिरूर) यांनी शिरूर पोलिसांत तक्रार दिली आहे.
शिरूर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत यातील पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेशन पोलिस पथकाच्या मदतीने आरोपी कुणाल सुभाषसिंग परदेशी रा . शिरूर यास अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्याबरोबरच आठ जणांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.
आरोपींनी आजीच्या आजारपणाचा बहाणा करून डॉक्टरला बोलावून घेतले. आरोपी हे कारमधून जात होते. तर डॉक्टर स्कुटरवर होते. त्या दरम्यान आरोपींनी अचानक कार स्कुटरच्या पुढे आडवी घातली. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. खंडणी वसुलीसाठी त्यांचे गळयावर धारदार कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देऊन कापडाने गळा आवळून त्यांना मारहाण केली. त्यांच्या खिशातील रोख पंधरा हजार रुपये तसेच गाडीच्या चाव्या, ऑक्सिमीटर ऍक्टिव्हा गाडी असे हिसकावुन घेतले. व खंडणी तीन लाख रूपये घेतले . त्यानंतर शनिवारी रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या दरम्यान शिरूर बाह्य मार्गावर नगर पुणे रोडवर सोडुन दिले. य प्रकरणी शिरूर पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण उंदरे करीत आहेत .