पुणे : महापालिकेच्या शाळांमधील मुलांना रेनकोट देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद नसल्याने हे रेनेकोट शिक्षण मंडळानेच खरेदी करावेत, अशी सूचना महापालिकेच्या मुख्य सभेत करण्यात आली. मात्र, रेनकोटसाठी सदस्यांनी प्रस्ताव देऊनही २0१५-१६च्या अंदाजपत्रकात त्यासाठी निधीची तरतूदच केली नसल्याने मुलांना रेनकोट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेचे २0१५-१६चे अंदाजपत्रक सादर करताना, तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौरांनी शिक्षण मंडळाच्या मुलांना रेनकोट घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिवसेनेच्या सभासदांना दिले होते. बुधवारी मुख्य सभेत महापौरांनी दिलेले रेनकोटसाठीचे आश्वासन पाळले जात नसल्याची खंत नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी बोलून दाखविली. तसेच पावसाळा सुरू झाल्याने पुढे रेनकोट द्यायचे असल्यास मंडळाने निधी द्यावा असे कर्णे यांनी नगरसेवकांना सुनावले.मुलांना रेनकोट देण्याची मागणी केली. मात्र, त्यासाठी निधी नसेल तर सेनेच्या नगरसेवकांनी वर्गीकरण सुचवावे त्यास मुख्य सभा मान्यता देईल, असे माजी सभागृहनेते सुभाष जगातप यांनी सभागृहात सांगितले. तर भाजपाचे गटनेते गणेश बिडकर आणि सेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनीही निधी देण्याची मागणी करत सभागृहात दिलेले आश्वासने पाळली जाणार नसतील तर या पुढे विश्वास कसा ठेवायचा असे महापौरांना सुनावले. या वेळी महापौरांनी स्थायी समितीने वर्गीकरण उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. या आदेशावरून स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम या नारज झाल्या. महापौरांनी आदेश देताना, रेनकोटसाठी निधीची तरतूद आहे का, नसेल तर वर्गीकरण कसे देणार, मंडळास अधिकार दिले असताना, स्थायी समिती निधी कसा देणार याबाबतचा विचार करून आदेश द्यावेत असे सुनावले. त्यावर माजी समिती अध्यक्षांनी यासाठी निधी नसल्याचे सांगत, यासाठी निधी देण्याची मागणी केली.
मुलांना अद्याप रेनकोट नाहीच
By admin | Published: July 24, 2015 4:08 AM