- अतुल चिंचली-
पुणे: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल गेम खेळण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या जीवनात मुलांमध्ये व तरुणाईमध्ये सतत चिडचिड करणे, एकाग्रता कमी होणे, अभ्यासात दुर्लक्ष होणे, हिंसा - आक्रमकता वाढणे अशी अनेक कारणे आढळून येत आहेत. ही कारणे आढळण्याचे एकमेव कारण म्हणजे मोबाईलवरील पबजी गेम आहे. पबजी गेमचे पूर्ण नाव प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड असे आहे. ब्लु होल कंपनीने या गेमची निर्मिती केली आहे. गेम फक्त अँडरॉईड मोबाईलमध्येच खेळला जातो. नकाशे वापरून अगदी सहजरित्या हे खेळली जाते. उत्तमोत्तम ग्राफिक्स आणि आवाज हे या गेमचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. बारीक बारीक गोष्टीही अतिशय स्पष्ट दिसतील, अशी सोय करण्यात आली आहे. आवाज आणि ध्वनीचा इतका प्रभावी वापर करण्यात आला आहे की, शत्रूच्या पावलांच्या आवाजावरून तो कोणत्या दिशेने आणि किती लांबून येत आहे. तसेच गाडीचा, पाण्याचा आवाज गेममध्ये स्पष्टपणे ऐकू येतो. पबजी हा रात्रीच्या वेळी खेळला जाणारा गेम आहे. १०० पेक्षा जास्त मुलं हा गेम खेळू शकतात. एकमेकांचा पाठलाग करणे, हत्यारे चोरणे, बंदुकीने गोळ्या मारणे, अशा गोष्टींच्या आधारे खेळल्या जातात. पबजीसाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. वायफायमुळे इंटरनेटला अधिक वेग येतो. त्यामुळे ही चांगल्या प्रकारे खेळता येते. पबजी गेम मुलांसाठी आणि तरुण पिढीसाठी एक व्यसन झाले आहे. या गेममुळे मानसिक आजाराला सामोरे जावे लागत आहे. युवक या गेममध्ये इतके अडकले आहेत की स्वत:ला त्या गेमचा भाग समजू लागले आहेत. क्रोध वाढून सतत भांडणे होतील का असा विचार मुलांच्या मनात येऊ लागला आहे. पबजीमुळे होणारे तोटे १. झोप कमी होणे२. शाळेत, महाविद्यालयात गैरहजर राहणे.३. चिडचिड होणे, भूक न लागणे.४. अभ्यास, व इतर कामांवर परिणाम होणे. ५. एकाच जागी बसून वजन वाढल्याने मधुमेह, रक्तदाब अशा आजारांची शक्यता वाढणे...................................................................................................कुठलेही व्यसन आपल्याला दुष्परिणाम दाखवते. त्यामुळे आपली क्रिएटिव्हिटी थांबते. मोबाईलमधील पबजी गेम हे एक व्यसन झाले आहे. या गेमचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. मुलांमध्ये आणि तरुण पिढीमध्ये वागणुकीत बदल होणे. सतत खोटं बोलणे लपवालपवी करणे अशा गोष्टी वाढू लागतात. खरतर या व्यसनासाठी पालकही कारणीभूत आहेत. पालक आपली कामे पूर्ण होण्यासाठी मुलांना मोबाईल घेऊन देतात. मुले मोबाईलवर काय करत आहेत याकडे दुर्लक्ष करतात. गेममुळे बौद्धिक विकासावर परिणाम होत नाही. परंतु नवीन सुचणे, नवीन काही करून दाखवणे, या गोष्टी घडू लागतात. त्याचप्रमाणे नैराश्यात वाढ होते. - दीपा निलेगावकर, समुपदेशक .................. .................. .. .........................................................सध्याची मुले श्रवण, वाचन यापासून दूर होत आहेत. सतत मोबाईल हातात घेऊन गेम खेळणे या गोष्टी वाढत आहेत. शाळेत आम्ही मुलांचे निरीक्षण केले. मुले फारच झोपाळू आणि आळशी झाली आहेत. त्यांना विचारले की सांगतात, आम्ही रात्रभर गेम खेळत होतो म्हणून झोप आली नाही. या मुलांच्या गेमच्या व्यसनामुळे स्मृती कमी होणे, एकाग्रता कमी होणे अशा गोष्टी घडत आहेत. मैदानी खेळ विसरून त्यांचा अस्थिरपणा वाढत चालला आहे. विद्या साताळकर अभिनव पूर्व प्राथमिक विद्यालय, माजी मुख्याध्यापिका ...................................................................................................पबजी गेममध्ये बंदुकीने गोळ्या मारणे, ठार करणे अशा हिंसक गोष्टी घडतात. या हिंसेचा बालमनावर मोठया प्रमाणात परिणाम होतो. मुलांमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये हिंसा वाढत जाते. मुले मैत्रभावना विसरून अहिंसेचा मार्ग अवलंब करत आहेत. गेमपासून मुलांना दूर केले पाहिजे. त्यामुळे संवाद कमी होत चालला आहे. काही मुलांना या गंभीर परिस्थितीमुळे समुपदेशन करण्याची गरज भासू शकते. सध्यस्थितीत यावर नियंत्रण आणणे फारच गरजेचे आहे. तसेच लहान मुलांना व तरुणांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त केले पाहिजे. - संगीता बर्वे, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन अध्यक्षा...................................................................................................उपाय १. पालकांनी मुलांशी सतत संवाद चालू ठेवला पाहिजे.२. मुलांना अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ खेळण्यास पाठवले पाहिजे.३.मोबाईलचा वापर माहिती मिळवणे, एकमेकांशी संपर्क वाढवणे या गोष्टींसाठी केला पाहिजे.४. एखाद्या मुलाच्या मानसिकतेवर परिणाम झाला तर समुपदेशन करण्याची गरज आहे....................................................................................................