पुणे : किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला रविवारी २५ वर्षे होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे पहाटेच तेथे पोहोचले होते़ त्या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, याचा जो धडा दिला तो आजही आमच्या लक्षात आहे़ ३० सप्टेंबरला रात्री भूकंप झाला़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार यांचा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फोन आला त्यांनी सांगितले, तुझी व्यापारी पेठांमध्ये ओळख आहे. टिंबर मार्केटमध्ये जाऊन तेथील व्यापाºयांकडून जेवढे वासे, पत्रे मिळतील, ते सर्व घेऊन इकडे पाठवून दे, या सर्वांचे पेमेंट ७ दिवसांत तुम्हाला मिळेल, असे सांगून त्यांच्याकडून बिले घेऊन मला पाठव, असे सांगून त्यांनी हा माल कोठे पाठवायचा त्याचा पत्ता दिला़ मी तातडीने टिंबर मार्केटमध्ये गेलो़ व्यापाºयांना सांगितले़ त्यानुसार पुढच्या तीन दिवसांत १०० ट्रक वासे, पत्रे व ते बांधण्यासाठी लागणारे खिळे, काथ्या असे सर्व साहित्य तेथील जिल्हाधिकाºयांकडे पाठवून दिले़
संपूर्ण राज्यातून आणि देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला होता़ ही मदत स्वीकारण्यासाठी काही सेंटर तयार केले होते़ त्यानंतर एक दिवस साहेब मुंबईला जाताना पुण्यात काही वेळ थांबले होते़ त्यांच्याकडे पाठविलेली बिले मंत्रालयातील अधिकारी तपासून १० दिवसांत बिलांनुसार सर्व व्यापाºयांच्या नावाने धनादेश तयार करुन माझ्याकडे सोपविण्यात आले़ मी ते व्यापाºयांना दिले़ शासकीय काम करताना जाहरिात द्या, टेंडर काढा व त्यानंतर ते मागवा, या सर्व गोष्टींना त्यांनी तातडीची गरज म्हणून फाटा देऊन लोकांना लवकरात लवकर कशी सोय उपलब्ध करुन देता येईल, हे पाहिले़ व्यापाºयांनीही भूकंपाची माहिती होती़ त्यांना मी सांगितले की बिलाबद्दल साहेबांच्या वतीने मी शब्द देत आहे़ अशा वेळी तुम्ही फार नफा घेऊ नका, असे आवाहन केले़ व्यापाºयांनीही त्यांना झालेला खर्च घेऊन कोणताही नफा न घेता साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून तातडीने माल पुरविला़गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला तसेच विरोधकात असतानाही पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्षपद साहेबांना दिले होते़भूकंपात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती़ अशा घरांत लोक राहायला घाबरत होतेच त्याशिवाय ते धोकादायकही होते़ त्यामुळे या सर्वांची तातडीने किमान निवाºयाची व्यवस्था करणे आवश्यक होते, हे ओळखून साहेबांनी पुण्यातून हे साहित्य तातडीने मागवून घेतले़ मला शक्य होते, तेवढे मी केले़ त्यानंतर दोन तीन दिवसांनी मी स्वत: तेथे गेलो तेव्हा साहेबांनी मला सांगून जसे वासे व पत्रे मागवून घेतले होते तसेच इतरांना सांगून निवारा तयार करण्यासाठी कारागिरांना बोलवून घेतले होते़ पुढच्या ७ दिवसांतच सर्वांना तात्पुरता होईना निवारा उपलब्ध झाला होता़ - विठ्ठल मणियार