पुणे: उन्हाळयात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आवडते फळ म्हणजे कोकणचा राजा हापूस मात्र चार ते पाच वर्षे नंतर पहिल्यांदाच आंब्याचा तुटवडा जाणवत असून पेटी मागे ५०० रूपये महाग मिळत आहेत. सर्वसामान्यांना अक्षय तृतीया नंतर आंबा स्वस्त मिळतो म्हणून खरेदी करण्यासाठी जात असतात. मात्र अक्षय तृतीया नंतरही आंब्याचां भाव तेवढाच असल्याने पेटी मागे पाचशे रुपये दर वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या तरी अजून आंबे महाग असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्याचे दिसत आहे. यंदा मात्र अवकाळी पाऊस आणि सततच्या वातावरणातील बदलांमुळे बाजारात हापूसची आवक कमी झाली आहे. तसेच तयार हापूस बाजारात कमी उपलब्ध असल्याने भावातही वाढ झाली आहे.
आंब्यांचे भाव
किरकोळ बाजारातील डझनाचे भाव
८०० ते १२०० रुपये
घाऊक बाजारातील भाव
४ ते ६ डझन पेटी -२५०० ते ३००० हजार रुपये५ ते १० डझन पेटी - ३५०० ते ६००० रुपये पेटी
काय आहेत कारणे
- अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा उत्पन्नावर परिणाम- बाजार पेठेत आंब्यांची आवक कमी- दरवर्षी आठ ते दहा हजार हापूस पेट्यांची आवक- यंदा हापूसची आवक दोन ते अदीड हजार पेटीपर्यंत- किरकोळ बाजारात एक डझन आंब्यांचां भाव ८०० ते १२००
दोनच डझन खरेदी करुन यावे लागले
अक्षय तृतीया निमित्त मार्केट यार्ड बाजारात आंबे खरेदी करण्यासाठी गेल्यावर आंब्याचा भाव प्रचंड होता. त्यात तयार आंबेही मिळत नसल्याने अक्षय तृतीया नंतर आंबे स्वस्त मिळतील म्हणून मंगळवारी मार्केट यार्ड मध्ये आंबे खरेदी करण्यासाठी गेले. आंबे अजूनही त्याच भावात मिळत असल्याने एक पेटी घेण्याऐवजी दोनच डझन खरेदी करुन यावे लागले. - रविना वायदंडे गृहणी