पुणे : आर्यन खान ड्रग्स केसमधील पंच किरण गोसावी याला पुणेपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन आले होते. मात्र तो हाती लागला नव्हता. किरण गोसावीने उत्तर प्रदेश पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे नकार मिळाल्यानंतर तो पुण्यात आला होता. तिथे तो पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र रात्री पुणे पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. ''पुण्यात २०१८ ला किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. त्यावेळेस त्याला फरारी म्हणून घोषित केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.''
''किरण गोसावीने फसवणूक केल्यानंतर त्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास सुरू होता पण त्याला अटक करण्यात आली नव्हती. म्हणूनच त्याला फरार घोषित करण्यात आले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. अजून काही गुन्हे असतील तर ते पण दाखल करण्यात येतील असंही ते यावेळी म्हणाले आहेत. ''
''लखनऊ, फत्तेपुर, लोणावळा अनेक ठिकाणी किरण गोसावी फिरला. त्याला शोधण्यासाठी पथके पाठवली होती. किरण गोसावी याने सचिन पाटील नाव वापरल होत. त्या नावाने हॉटेलमध्ये राहत होता. आता कात्रज मधून किरण गोसावी ला ताब्यात घेतल आहे.''
''गोसावीची मेडिकल आणि कोरोना टेस्ट केल्यानंतर कोर्टात हजर केल जाणार आहे. किरण गोसावीला लगेच मुबंई पोलिस किंवा एनसीबी ला देण्याआगोदर त्याच्या पुण्यातील गुन्ह्याचा तपास केला जाईल. पुण्यातील तपास संपल्यानंतर कुठल्याही संस्थेला चौकशी ला देऊ असाही ते म्हणाले आहेत.''
''किरण गोसावी Stop crime organaisation अशी एनजीओ चालवत असल्याचे सांगत होता. तसेच मुलांना परदेशात नोकरी लावून देण्याबरॊबरच इम्पोर्ट एक्स्पोर्टचा धंदा करत असे असंगी माहिती गुप्ता यांनी यावेळी दिली.''