जेजुरी: श्री क्षेत्र जेजुरी येथील जेजुरीगड मंदिरामध्ये दि.२०, २१ व २२ मार्च रोजी किरणोत्सव पार पडला. मार्च आणि सप्टेंबर महिन्यातील २२ तारखेच्या सुमारास जगात सर्वत्र दिनमान समान दिवस रात्रीचे असते. संपुर्ण वर्षातील सहा दिवस जेजुरी गडावर किरणोत्सव होत असतो. सप्टेंबर मध्ये तीन दिवस आणि मार्च महिन्यामध्ये तीन दिवस असे सहा दिवस सूर्यकिरण मंदिरातील स्वयंभू लिंग ते मार्तंड भैरव मूर्तीपर्यंत संपूर्ण गर्भगृह व्यापून टाकतात.सप्टेंबर महिन्यामध्ये बहुतांश वेळा ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन होत नाही, परंतु, मार्च महिन्यामध्ये स्वच्छ वातावरण असल्याने किरणोत्सव होत असतो. सकाळी सात वाजून १८ मिनिटांनी सूर्यकिरण गर्भगृहामध्ये दाखल झाल्याबरोबर भाविक आणि पुजारी मंडळीनी सदानंदाचा येळकोट असा एकाच जल्लोष केला. सात वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत मार्तंड भैरवाला सूर्यस्नान घडले. ऐतिहासिक वास्तुरचनेतील अदभूत आविष्कार पाहावयास मिळतो. यावेळी सचिन उपाध्ये गुरुजी,मयूर सातभाई, धनंजय आगलावे, गणेश शेरे, नितीन बारभाई, दिलीप मोरे आणि मार्तंड देवस्थान कर्मचाऱ्यांनी किरणोत्सव आणि पुजेची सर्व व्यवस्था पार पाडली.
श्री क्षेत्र जेजुरीगड मंदिरामध्ये किरणोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 6:00 PM