भोर : आळंदेवाडी-भैरवनाथनगर (ता. भोर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर जग्गनाथ थोपटे तर उपसरपंचपदी राजेंद्र कैलास सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आळंदेवाडी-भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या सर्वच सात जागा या बिनविरोध झाल्या होत्या. सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण पुरुष जागेसाठी असल्याने या जागी किशोर थोपटे यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. आमदार संग्राम थोपटे व जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदेवाडी-भैरवनाथनगर या गावाच्या विकासकामांसाठी सतत्त्याने पाठपुरावा करुन जनतेची पाच वर्षे काम करणार असल्याचे सरपंच किशोर थोपटे यांनी सांगितले आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्जेराव बोडके यांनी कामकाज पाहिले.
फोटो : आळंदेवाडी-भैरवनाथनगर (ता. भोर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर जगन्नाथ थोपटे तर उपसरपंचपदी राजेंद्र कैलास सुर्वे.