शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; मात्र, अंदाजपत्रकात आयुक्तांची कोटीच्या कोटी उड्डाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 12:13 PM

सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षासाठी तब्बल ७ हजार ६५० कोटींचे अंदाजपत्रक तयार

पुणे : पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना पालिकेने मात्र अंदाजपत्रकात कोटीचाकोटी उड्डाणे घेतली आहेत. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्यांचे पाहिले अंदाजपत्रक सादर केले. सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षासाठी तब्बल ७ हजार ६५० कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. 

गेल्या तीन चार वर्षांत उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढविण्यात अपयश आलेले असतानाही आयुक्तांकडून मात्र कोणतेही पर्याय न देता अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे. शहरातील पायाभूत सुविधा वाढविणे, शहरातील सर्वात महत्वाचे प्रमुख २० रस्ते पीपीपी मॉडेलद्वारे विकसित करणे, येरवडा येथे वाहतूक उद्यान उभारणे, घनकचरा, पाणी पुरवठा, इलेक्ट्रिक बस खरेदी करणे, सार्वजनिक सुविधा विकसित करणे, दहा किलोमीटरचे सायकल ट्रॅक तयार करणे यासाठी तरतूद करण्यात आली आहे. 

यासोबतच शहराच्या भोवतीने नव्याने तीन टिपी स्कीम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच ११ गावांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. नदी सुधार प्रकल्पावर विशेष भर देण्यात येणार असून त्यासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. झोपडपट्टीमुक्त शहर, पंतप्रधान आवास योजना आणि पालिका कर्मचारी यांना हक्काची घरे देण्याविषयीही तरतूद केल्याचे आयुक्त म्हणाले. खासगी भागीदारीतून अत्याधुनिक प्रशिक्षण देणारे केंद्र उभारणार आहे. तसेच आयटी स्टॅर्ट अप साठी निधी देऊन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. 

आयुक्तांनी अंदाजपत्रकात नियमित कर भरणा करणाऱ्यांसाठी लोयल्टी स्कीम आणणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच सीएसआरच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण सुविधा सुधारणार व आणखी नावीन्य आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील सांगितले. नवीन लाईट हाऊस तयार करणे, डिजिटल लिटरसीवर भर देणार असेही ते म्हणाले. 

भांडवली आणि महसुली तरतूद1) पाणी पुरवठा - 1137 कोटी2) मलनिस्सारण - 685 कोटी3) घनकचरा व्यवस्थापन - 703 कोटी4) आरोग्य - 574 कोटी5) वाहतूक नियोजन - 650 कोटी6) पथ - 925 कोटी7) पुणे महानगर परिवहन महामंडळ लि - 378 कोटी8) उद्यान - 104 कोटी9) विद्युत - 134 कोटी10) भवन रचना - 377 कोटी11) माहिती आणि तंत्रज्ञान - 46 कोटी12) शिक्षणासाठी आधुनिक सुविधा - 384 कोटी प्राथमिक / 71 कोटी माध्यमिक

संभाव्य उत्पन्न

1) स्थानिक संस्था कर - 170 कोटी2) वस्तू आणि सेवा कर - 19853) मिळकत कर - 2356 कोटी4) बांधकाम परवानगी आणि विकास शुल्क - 985 कोटी5) पाणीपट्टी - 492 कोटी आणि उर्वरित सर्व जमा बाजू धरून 7650 कोटी जमाखर्चाचा अंदाज आयुक्त विक्रम कुमार यांनी वर्तवला. म्हणजे जितका अर्थसंकल्प सादर केला तितकंच जमा करण्याचं उद्धिष्ट आयुक्तांनी ठेवलेलं आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याMayorमहापौरcommissionerआयुक्तTaxकर