पुणे : पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून त्यांच्या जागी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत शेखर गायकवाड ?
- गायकवाड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मलठण येथील आहेत.
- त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९८४ साली कृषी सेवा वर्ग या पदासाठी निवड झाली होती.
- त्यांनी जिल्हा पुनर्विकास अधिकारी कोल्हापूर, मुख्यमंत्री व राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव, महाराष्ट्र जीवनप्राधिकरणाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे.
- याशिवाय नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम काम पहिले आहे.
- मागील वर्षी त्यांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक म्ह्णून पदभार स्वीकारला.
- प्रशासनाच्या नव्या वाटा पुस्तकाचे लेखक
अशी आहे गायकवाड यांची कार्यपद्धती :
- मनमिळावू अधिकारी म्हणून प्रशासनात ओळख
- महसूल विभागात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव
-प्रशासनावर नियंत्रण असणारा आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारा अधिकारी म्हणून दबदबा
नवीन आयुक्तांसमोर असणार ही आव्हाने :
-२४ बाय ७ पाणीपुरवठा योजना
-जायका प्रकल्प
- शहरातील अरुंद रस्ते
-वाढते नागरीकरण आणि अपुरी प्रशासन व्यवस्था