मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील कोंढावळे ते पानशेत रस्ता खचू लागला आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांच्यासह स्थानिकांनी केली आहे.
कोंढावळे ते पानशेत रस्त्यावरील कोंढावळे जवळ रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा पडला असून रस्ता खालच्या बाजूने पोखरत जात आहे. या खड्ड्यात अचानक एखादे वाहन अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या अंधारात रस्ता दिसत नाही त्यामुळे वाहन खड्ड्यात पडण्याची शक्यता आहे. पावसाचे कारण सांगून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. गेल्या दहा दिवसापासून पाऊस थांबलेला आहे, तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप या रस्त्यावर कोणताही खड्डा बुजवला नाही. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद देशमाने यांनी या रस्त्यावरील खड्डे ताबडतोब जावेत, अशी मागणी यावेळी केली आहे.
२६ मार्गासनी
कोंढावळे (ता. वेल्हे) येथील रस्त्यावर पडलेला खड्डा.