कात्रज : शहरात सध्या करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही लोक सर्रासपणे घराबाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणे व सामाजिक आंतर न ठेवणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एक महिन्यात ३ लाख ६१ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे.
कोंढवा-येवलेवाडी कार्यालयांच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. ज्योती धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक मंदृपकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, आरोग्य निरीक्षक विकास मोरे, सचिन बिबवे, अभिजित सूर्यवंशी, सुनील गोसावी, सचिन इगवे, गणेश साठे, संदीप खरात, उमेश ठोंबरे यांनी ही कारवाई केली आहे. तसेच भागातील मंगल कार्यालय, हॉटेल यांनी कारोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ६५५ व्यावसायिकांवर कारवाई केली. याबाबत कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांनी सुरक्षित अंतर व मास्क घालणे व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
-----------------
फोटो ओळ: कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विनामास्क कारवाईचा धडाका सुरू आहे. एका व्यापाऱ्याला दंड करताना अधिकारी.