लोकमत न्यूज नेटवर्कमहाळुंगे : चाकण-तळेगाव राज्यमार्गावरील महाळुंगे (ता. खेड) गावाच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या एमआयडीसी चौकात दररोज वाहतूककोंडी होत आहे. यामुळे वाहनचालक, कामगार, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. खालुम्ब्रे व महाळुंगे या गावांजवळ दररोज सकाळी, सायंकाळी, रात्रीच्या सुमारास वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.या गावाजवळ तसेच चौकाजवळ रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने लावण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. ही अतिक्रमणे काढण्यासाठी ग्रामपंचायत तसेच राज्यमार्गाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे, असा आरोप नागरिक करत आहे. रस्ता अरुंद झाल्याने तसेच दोन्ही गावांचे पूल अरुंद आहेत. अवजड वाहनांमुळे वाहतूक होत आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी तसेच राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्याची घोषणा झाली; पण अजून रस्त्याच्या कामास काही सुरुवात झाली नाही. हा रस्ता औद्योगिक वसाहतीचा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूककोंडीकडे एमआयडीसी राज्य मार्ग प्रकल्प विभाग तसेच राजकीय नेत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी उद्योजक, कामगार, परिसरातील नागरिक यांची आहे.
चाकण-तळेगाव रस्त्यावर कोंडी
By admin | Published: June 26, 2017 3:37 AM